IRCTC Tour Package: नव्या वर्षाचं सेलिब्रेशन गोव्यात! 'आयआरसीटीसी'ने आणलंय स्वस्त आणि मस्त टूर पॅकेज; लगेच करा बुकिंग

IRCTC Goa Tour Package: डिसेंबर महिना आला की, सर्वांना वेध लागतात ते म्हणजे ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे.
IRCTC Goa Tour Package
IRCTC Goa Tour PackageDainik Gomantak
Published on
Updated on

डिसेंबर महिना आला की, सर्वांना वेध लागतात ते म्हणजे ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे. अशातच पर्यटकांची पहिली पसंती असते ती म्हणजे 'गोवा'. मात्र, या काळात गोव्यातील हॉटेल्स आणि विमानांची तिकिटे गगनाला भिडलेली असतात. पर्यटकांची हीच अडचण ओळखून आयआरसीटीसीने (IRCTC) एक विशेष आणि किफायतशीर टूर पॅकेज जाहीर केले आहे. 'व्हायब्रंट गोवा' असे या पॅकेजचे नाव असून, याद्वारे पर्यटकांना कमी खर्चात गोव्याची सफर करता येणार आहे.

टूर पॅकेज

हे टूर पॅकेज एकूण ३ रात्री आणि ४ दिवसांचे आहे. या प्रवासाची सुरुवात २५ डिसेंबर २०२५ रोजी देशाची राजधानी दिल्ली येथून होणार आहे. पर्यटकांचा वेळ वाचावा आणि प्रवास सुखकर व्हावा यासाठी दिल्ली ते गोवा असा विमान प्रवास (Flight) या पॅकेजमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

गोव्यात पोहोचल्यानंतर पर्यटकांना विविध पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी वातानुकूलित बसची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या पॅकेजमध्ये राहण्याची आणि भोजनाची उत्तम सोय IRCTC तर्फे केली जाणार असल्याने पर्यटकांना स्वतंत्र बुकिंगचे टेन्शन घेण्याची गरज उरणार नाही.

IRCTC Goa Tour Package
Goa ZP Election 2025: फोंडा तालुक्यातील कौल कोणाच्या बाजूने? भाजपची प्रतिष्ठा पणाला; विधानसभेची रंगीत तालीम

गोवा हे केवळ समुद्रकिनाऱ्यांसाठीच नाही, तर तिथली संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि नाईटलाईफसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या सहलीदरम्यान पर्यटकांना गोव्यातील प्रसिद्ध बीच, चर्च आणि स्थानिक बाजारपेठांना भेट देता येईल. सणासुदीच्या काळात गोव्यातील वातावरण अत्यंत उत्साही असते, याचा प्रत्यक्ष अनुभव पर्यटकांना घेता येईल.

शुल्क

IRCTC ने हे पॅकेज अतिशय लवचिक ठेवले आहे. जर तुम्ही एकटे प्रवास करणार असाल, तर प्रति व्यक्ती ५२,७२० रुपये शुल्क आकारले जाईल. दोन व्यक्तींसाठी प्रति व्यक्ती ३९,२६० रुपये आणि तीन व्यक्तींच्या ग्रुपसाठी प्रति व्यक्ती ३६,७०० रुपये इतके शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

IRCTC Goa Tour Package
Salt Production Goa: गोव्यात एकेकाळी 75 पेक्षा अधिक मिठागरे होती, 130 प्रकारची मिठे होती; गोमंतकीयांची खरी चव नष्ट होत चालली आहे

कसं कराल बुकिंग?

या सहलीसाठी जागा मर्यादित असून, 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर बुकिंग सुरू आहे. इच्छुक पर्यटक IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर (www.irctctourism.com) जाऊन आपला कोटा बुक करू शकतात. नवीन वर्षाचे स्वागत गोव्याच्या अथांग समुद्रकिनाऱ्यावर करण्याची ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com