Nora Fatehi Accident: नोरा फतेहीच्या कारला जोरदार धडक; अभिनेत्रीच्या डोक्याला दुखापत, मद्यधुंद चालकाचा हैदोस!

Nora Fatehi Car Accident: बॉलिवूडची प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री नोरा फतेहीच्या चाहत्यांसाठी एक काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे.
Nora Fatehi Accident
Nora Fatehi AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: बॉलिवूडची प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री नोरा फतेहीच्या चाहत्यांसाठी एक काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. आपल्या नृत्याने आणि सौंदर्याने कोट्यवधी दिलांवर राज्य करणाऱ्या नोराच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताची माहिती मिळताच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. या घटनेनंतर नोराला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात झाला तेव्हा परिसरात मोठी खळबळ उडाली होती. नोराला दुखापत झाली असल्याने कोणतीही जोखीम न पत्करता तिला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. अभिनेत्रीच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

डॉक्टरांनी तातडीने तिचे 'सीटी स्कॅन' (CT Scan) करण्याचा निर्णय घेतला. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे नोराचे कुटुंबीय आणि निकटवर्तीय काही काळ तणावाखाली होते.

Nora Fatehi Accident
Goa ZP Election 2025: फोंडा तालुक्यातील कौल कोणाच्या बाजूने? भाजपची प्रतिष्ठा पणाला; विधानसभेची रंगीत तालीम

नोराच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, सीटी स्कॅनचा अहवाल आल्यानंतर डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. या अपघातात नोराला कोणतीही मोठी किंवा जीवघेणी दुखापत झालेली नाही.

Nora Fatehi Accident
Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सायंकाळी 4 वाजेपर्यंत 63.59 टक्के मतदान

तिला केवळ किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या असून तिची प्रकृती आता स्थिर आहे. डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की, घाबरण्याचे कोणतेही कारण नाही आणि अभिनेत्री आता धोक्याबाहेर आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर तिला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com