Finance Minister Nirmala Sitharaman  Dainik Gomantak
अर्थविश्व

Cryptocurrency बाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे राज्यसभेत मोठे विधान

एका डॉलरपासून सुरू झालेल्या क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनची किंमत आज 60 हजार डॉलर आहे.

दैनिक गोमन्तक

Cryptocurrency Bill: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज मंगळवारी संसदेत क्रिप्टोकरन्सीबाबत (Cryptocurrency) मोठे विधान केले आहे. सीतारामन यांनी आज राज्यसभेत सांगितले की, सरकार(Government) लवकरच क्रिप्टोकरन्सीबाबत विधेयक आणणार आहे. अर्थमंत्र्यांनी संसदेत सांगितले की, क्रिप्टोकरन्सीसंदर्भातील नियमावलीवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान अर्थमंत्री सीतारामन यांनी हे महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्या म्हणाल्या की, "हे एक धोकादायक क्षेत्र आहे आणि संपूर्ण नियामक चौकटीत नाही. मात्र त्याच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. RBI आणि SEBI मार्फत जनजागृती करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत." सरकार लवकरच विधेयक मांडणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

क्रिप्टोच्या जाहिरातींवर अर्थमंत्र्यांचे विधान

ASCI जाहिरातींवर नियंत्रण ठेवते. त्याचे सर्व नियम बघितले जात आहेत, जेणेकरून जाहिरातींबाबत काय करता येईल ते ठरवता येईल. मंत्रिमंडळातून विधेयक मंजूर करून सरकार लवकरच विधेयक आणेल, मागच्या वेळी विधेयक आणू शकले नाही कारण इतर गोष्टींचा अभ्यास करणे बाकी होते. या प्रकरणात झपाट्याने अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. या विधेयकात सुधारणा करण्याचा उद्देश असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

सीतारामन म्हणाल्या की, "सरकार संसदेत विधेयक आणण्याच्या प्रयत्नात आहे. शेवटचे बिल पुन्हा तयार केले आहे. येणारे विधेयक हे नवीन विधेयक असणार आणि सरकार क्रिप्टोकरन्सीमधून चुकीच्या कृत्यांच्या धोक्याचे बारकाईने निरीक्षण करत आहे."

संसदेत सरकारला काय प्रश्न विचारला होता?

एका डॉलरपासून सुरू झालेल्या क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनची किंमत आज 60 हजार डॉलर आहे. देशात कोटय़वधी लोकांनी यामध्ये गुंतवणूक केल्याचा अंदाज आहे. आणि त्यात लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. भारत सरकार अशा लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ते सध्या सुरक्षित नाही, त्यात पैसे गुंतवल्यास आपल्याला जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. या प्रश्नानुसार, विधेयक येईपर्यंत त्यात पैसे गुंतवू नका, असे अर्थ मंत्रालयाकडून वारंवार सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

SCROLL FOR NEXT