FD Rate Hike Dainik Gomantak
अर्थविश्व

FD Rate Hike: 'एफडी'वरील व्याजदरात वाढ; 'या' बँकांनी दिले ग्राहकांना गिफ्ट, या यादीत तुमची बँक आहे का?

बँकांच्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार वाढिव एफडी दराचा लाभ

गोमंतक ऑनलाईन टीम

Fixed Deposit Rate Hike: देशातील बहुतेक मोठ्या बँका उदाहरणार्थ ICICI बँक, HDFC बँक, SBI इत्यादींनी सप्टेंबर 2023 मध्ये त्यांच्या FD व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. परंतु अशा काही बँका आहेत ज्यांनी त्यांच्या ग्राहकांना एफडी योजनांवर जास्त व्याजदराची भेट दिली आहे.

बँकेने एफडीवरील व्याजदर वाढवणे म्हणजे त्यात ग्राहकांचा फायदा होणे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा लाभ मिळत असतो. तर जाणून घेऊया या बँकांविषयी आणि त्यांनी एफडीवर वाढवलेल्या व्याजदरांविषयी..

IDBI बँक

आयडीबीआय बँकेने 15 सप्टेंबर 2023 रोजी FD व्याजदरात वाढ केली. बँक सर्वसामान्य नागरिकांना 3 ते 6.80 टक्के व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3.50 ते 7.30 टक्के व्याजदर देत आहे.

Axis बँक

अॅक्सिस बँकेने 15 सप्टेंबर 2023 पासून काही कालावधीच्या FD योजनांवरील ग्राहकांच्या व्याजदरात 50 बेस पॉईंट्सची वाढ केली आहे. हे व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू करण्यात आले आहेत.

या बदलानंतर, सामान्य ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 3 ते 7.10 टक्के व्याजदर मिळत आहे.

कोटक महिंद्रा बँक

कोटक महिंद्रा बँकेने 13 सप्टेंबर 2023 रोजी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वरील व्याजदर बदलले आहेत. यानंतर, बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 2.75 टक्के ते 7.25 टक्के व्याजदर देत आहे.

येस बँक

येस बँकेने 4 सप्टेंबर 2023 रोजी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD योजनेत बदल केले आहेत. यानंतर बँक सामान्य ग्राहकांना 3.25 ते 7.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.75 टक्के ते 8.25 टक्के व्याजदर देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 19 August 2025: नोकरीत बदलाची शक्यता, प्रवासाचे योग; मोठे निर्णय घाईघाईने घेऊ नका

Army Jawan Assaulted: देशरक्षकच असुरक्षित? लष्कराच्या जवानाला टोल नाक्यावर खांबाला बांधून मारहाण, 6 जण अटकेत

Heavy Rain in Goa: राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा; 100 इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद

Pune-Sindhudurg Flight: पुण्यातील कोकणवासियांना बाप्पा पावला... गणेश चतुर्थीनिमित्त 'Fly91'च्या उड्डाण संख्येत वाढ, वाचा सविस्तर

Memu Special Train: कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 'या' मार्गावर धावणार अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन

SCROLL FOR NEXT