FASTag Toll Collection 2022: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुरु केलेल्या फास्टॅगच्या सुविधेमुळे महामार्गावरील प्रवास अधिक सोपा झाला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) टोल प्लाझावर FASTag द्वारे मोठा फायदा मिळवला आहे. 2022 मध्ये टोल वसुली 46 टक्क्यांनी वाढून 50,855 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यात राज्य महामार्गांच्या टोलनाक्यांचाही समावेश आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने मंगळवारी ही माहिती दिली.
2021 मध्ये, टोल प्लाझावर फास्टॅगद्वारे एकूण 34,778 कोटी रुपयांची टोल वसुली करण्यात आली. NHAI ने जारी केलेल्या निवेदनानुसार, राष्ट्रीय महामार्ग (National Highway) टोल प्लाझावर डिसेंबर 2022 मध्ये FASTag वरुन सरासरी दैनंदिन टोल संकलन 134.44 कोटी रुपये होते. तर 24 डिसेंबर 2022 रोजी सर्वाधिक एक दिवसाचे संकलन 144.19 कोटी रुपये होते.
सरकारी निवेदनानुसार, फास्टॅग व्यवहारांची संख्या देखील 2022 मध्ये वार्षिक आधारावर सुमारे 48 टक्क्यांनी वाढली आहे. 2021 आणि 2022 मध्ये ही संख्या अनुक्रमे 219 कोटी आणि 324 कोटी रुपये होती.
NHAI ने सांगितले की, आतापर्यंत 6.4 कोटी FASTags जारी केले गेले आहेत. FASTag द्वारे शुल्क वजा करणार्या प्लाझांची संख्या देखील 2021 मध्ये 922 वरुन 1,181 (323 राज्य महामार्ग प्लाझांसह) वाढली आहे. FASTag च्या मदतीने, टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळ खूपच कमी झाला आहे, कारण या प्रणालीमध्ये शुल्क भरण्यासाठी टोल बूथवर थांबण्याची आवश्यकता नाही.
सरकारने (Government) 16 फेब्रुवारी 2021 पासून सर्व खाजगी आणि व्यावसायिक वाहनांसाठी FASTag अनिवार्य केले आहे. ज्या वाहनांकडे वैध किंवा सध्याचा FASTag नाही, अशा वाहनांना टोल शुल्काच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून भरावी लागते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.