PM Kisan Samman Nidhi 13th Installment: देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या देशाची निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांसाठी (पीएम किसान) 15 लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.
याबाबत माहिती देताना सरकारने म्हटले आहे की, देशभरातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पीएम किसान एफपीओ योजना असे या योजनेचे नाव आहे. यामध्ये तुम्हाला 15 लाख रुपयांची संपूर्ण आर्थिक मदत मिळत आहे.
माहिती देताना, सरकारने सांगितले की, या योजनेंतर्गत, ही आर्थिक मदत 11 शेतकरी गटांना म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटना (FPO/FPC) शेतीशी संबंधित सर्व व्यवसाय सेटअपसाठी दिली जाते. शेतकऱ्यांना (Farmer) आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एकत्र एक संस्था किंवा कंपनी (FPO) बनवावी लागेल, ज्यामध्ये किमान 11 शेतकरी असावेत.
>> तुम्ही राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर (https://www.enam.gov.in/web/) जा.
>> येथे FPO च्या पर्यायावर क्लिक करा.
>> यानंतर 'Registration' या पर्यायावर जा.
>> आता नोंदणी फॉर्ममध्ये मागितलेली माहिती भरा.
>> आता पासबुक किंवा रद्द केलेला चेक आणि आयडी प्रूफ स्कॅन करा आणि अपलोड करा आणि सबमिट करा.
या योजनेअंतर्गत सरकारला (Government) देशभरात सुमारे 10,000 एफपीओ तयार करायचे आहेत. यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्याही स्वावलंबी होतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.