EPFO  Dainik Gomantak
अर्थविश्व

EPFO: PF खातेधारकांचे बल्ले-बल्ले, सरकारने ट्विट करुन दिली मोठी अपडेट

Employees Provident Fund: पीएफ खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

Employees Provident Fund: पीएफ खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 7 कोटी ग्राहकांच्या खात्यात व्याजाचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. सरकार आर्थिक वर्ष 2022 चे व्याज EPF खातेधारकांच्या खात्यात हस्तांतरित करत आहे. यावेळी 8.1 टक्के दराने व्याज मिळत आहे.

व्याज कसे मोजायचे

जर तुमच्या पीएफ (PF) खात्यात 10 लाख रुपये असतील तर तुम्हाला 81,000 रुपये व्याज मिळेल.

तुमच्या पीएफ खात्यात 7 लाख रुपये असल्यास तुम्हाला 56,700 रुपये व्याज मिळेल.

तुमच्या पीएफ खात्यात 5 लाख रुपये असल्यास 40,500 रुपये व्याज म्हणून येतील.

तुमच्या खात्यात एक लाख रुपये असतील तर 8,100 रुपये येतील.

Missed Call वरुन अशाप्रकारे बॅलन्स जाणून घ्या

बॅलन्स चेक करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरुन 011-22901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर, तुम्हाला EPFO ​​च्या मेसेजद्वारे पीएफची माहिती मिळेल. इथे तुमचा UAN, PAN आणि आधार लिंक असणे देखील आवश्यक आहे.

2. याप्रमाणे ऑनलाइन बॅलन्स तपासा

1. ऑनलाइन बॅलन्स चेक करण्यासाठी, EPFO ​​वेबसाइटवर लॉग इन करा, epfindia.gov.in वर ई-पासबुकवर क्लिक करा.

2. आता तुमच्या ई-पासबुकवर क्लिक केल्यावर passbook.epfindia.gov.in वर एक नवीन पेज येईल.

3. आता इथे तुम्ही तुमचे युजरनेम (UAN नंबर), पासवर्ड भरा.

4. सर्व तपशील भरल्यानंतर, तुम्ही एका नवीन पेजवर याल आणि इथे तुम्हाला मेंबर आयडी निवडावा लागेल.

5. इथे तुम्हाला तुमचा ईपीएफ बॅलन्स ई-पासबुकवर मिळेल.

UMANG App वर बॅलन्स चेक करा

1. यासाठी, तुम्ही तुमचे UMANG App (Unified Mobile Application for New-age Governance) ओपन करा आणि EPFO ​​वर क्लिक करा.

2. आता दुसऱ्या पानावर, एम्प्लोई-सेंट्रिक सर्विसवर क्लिक करा.

3. इथे तुम्ही 'View Passbook' वर क्लिक करा. यासह, तुम्ही तुमचा UAN क्रमांक आणि पासवर्ड (OTP) क्रमांक भरा.

4. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. यानंतर तुम्ही तुमचा पीएफ बॅलन्स तपासू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT