EPFO Subscribers: EPFO ची व्याप्ती ​​10 कोटी सदस्यांपर्यंत वाढणार, केंद्र सरकारचा मोठा दावा

Bhupendra Yadav: EPFO ​​ने सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या सदस्यांना कर्मचारी पेन्शन योजना 1995 (EPS-95) अंतर्गत ठेवी काढण्याची परवानगी दिली होती.
EPFO
EPFODainik Gomantak

Retirement Fund Body: सेवानिवृत्ती निधी संस्था (EPFO) ​​ची व्याप्ती सध्याच्या 6.5 कोटी सदस्यांवरुन 10 कोटी सदस्यांपर्यंत वाढवली जाईल, असे केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 70 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना यादव म्हणाले की, 'EPFO च्या सामाजिक सुरक्षा योजनांची व्याप्ती वाढवली जाईल. ते 6.5 कोटी सदस्यांवरुन 10 कोटी करण्यात येणार आहे.'

व्हिजन 2047 या दस्तऐवजाचेही अनावरण करण्यात आले

त्यांनी EPFO ​​च्या व्हिजन 2047 डॉक्युमेंटचे अनावरणही केले. ते पुढे म्हणाले की, 'ईपीएफओची सर्वात मोठी जबाबदारी ही प्रकरणे कमी करणे आणि प्रसार वाढवणे आहे.' यापूर्वी, EPFO ​​ने सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या सदस्यांना कर्मचारी पेन्शन योजना 1995 (EPS-95) अंतर्गत ठेवी काढण्याची परवानगी दिली होती.

EPFO
EPFO Withdrawal: खूशखबर! PF खात्यातून काढता येणार दुप्पट पैसे, पण...

तुम्ही पीएफमधून दुप्पट पैसे काढू शकता

कर्मचारी (Employees) आता त्यांच्या पीएफ (PF) खात्यातून दुप्पट पैसे काढू शकतात. वास्तविक, यापूर्वी ईपीएफओने कर्मचाऱ्यांना नॉन-रिफंडेबल अ‍ॅडव्हान्स काढण्याची परवानगी दिली होती. पण आता ही सुविधा दुप्पट पर्यंत अ‍ॅडव्हान्स पैसे काढण्यासाठी उपलब्ध आहे. म्हणजेच, आता कोरोनामुळे त्रासलेला कर्मचारी हा निधी दोनदा काढू शकतो, तर यापूर्वी ही सुविधा एकदाच उपलब्ध होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com