PM Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

EPFO Higher Pension Scheme: पेन्शनधारकांचे बल्ले-बल्ले, उद्यापासून 'या' लोकांना मिळणार पेन्शन; परिपत्रक जारी!

Pension News Update: लाखो पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी. तुम्हालाही अधिक पेन्शन मिळवायचे असेल तर तुमच्याकडे आज फक्त वेळ आहे.

Manish Jadhav

Pension News Update: लाखो पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी. तुम्हालाही अधिक पेन्शन मिळवायचे असेल तर तुमच्याकडे आज फक्त वेळ आहे. ईपीएफओने याबाबत परिपत्रक जारी केले आहे.

यापूर्वी, निवड करण्याची अंतिम तारीख 26 जून होती, परंतु नंतर सरकारने ती 11 जुलैपर्यंत वाढवली होती, म्हणजेच आजचा दिवस तुम्हाला त्याचा लाभ घेण्यासाठी शेवटचा दिवस आहे. यानंतर, तुम्ही हायर पेन्शनचा पर्याय निवडू शकणार नाही.

शासनाकडून अनेक सुविधा उपलब्ध

केंद्र आणि राज्य सरकारकडून देशभरातील कर्मचाऱ्यांना (Employees) अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. आता तुम्हाला EPFO ​​मधून हायर पेन्शन निवडण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्ही आज हा पर्याय निवडला नाही, तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकणार नाही.

कोण अर्ज करु शकतो?

दुसरीकडे, हायर पेन्शन योजनेचा लाभ घेऊन तुम्हाला तुमच्या EPS मध्ये योगदान वाढवायचे असेल, तर त्यासाठी अर्ज करण्याची 11 जुलै ही शेवटची तारीख आहे. जर तुम्ही 1 सप्टेंबर 2014 रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य झाला असाल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करु शकता.

हायर पेन्शनचा फायदा

जर तुम्ही हायर पेन्शनचा पर्यायही निवडलात तर तुम्हाला निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम कमी होईल, पण तुम्हाला दरमहा मिळणारी पेन्शनची रक्कम वाढेल. या पेन्शन योजनेचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत असे अनेक तज्ञांचे मत आहे.

असे मानले जाते की, जर तुमच्या नोकरीमध्ये फक्त काही वर्षे शिल्लक असतील तर तुम्ही एकरकमी रकमेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. याशिवाय, नोकरीत अजून बरीच वर्षे असतील तर तुम्ही हायर पेन्शनचा पर्याय निवडू शकता.

हायर निवृत्ती वेतनासाठी अर्ज कसा करावा-

>> हायर पेन्शनसाठी (Pension) सर्वप्रथम ई-सेवा पोर्टलवर जावे लागेल.

>> त्यानंतर Pension on Higher Salary वर क्लिक करा.

>> आता तुम्ही नवीन पेजवर पोहोचाल जिथे तुम्हाला 2 पर्याय दिसतील.

>> 1 सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्त होणाऱ्यांना पहिला पर्याय निवडावा लागेल.

>> याशिवाय तुम्ही अजूनही नोकरी करत असाल तर तुम्हाला दुसरा पर्याय निवडावा लागेल.

>> UAN, नाव, जन्मतारीख, आधार, मोबाईल असे तपशील भरावे लागतील.

>> आता तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाकावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT