शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला सरकारी नोकरी (Government Jobs) मिळावी, यासाठी अनेक तरुण-तरुणी प्रयत्नशील असतात. सरकारी अधिकारी पदावर संधी मिळावी, यासाठी तरुण यूपीएससी, एमपीएससीसारख्या कठीण परीक्षादेखील देतात. सरकारी नोकरीत मिळणारं वेतन, फंड, ग्रॅच्युइटी, पदोन्नती आणि पेन्शन या गोष्टी पाहता देशातल्या बहुतांश तरुणांचा कल ही नोकरी मिळवण्याकडे असतो. पण नोकरीच्या संधी कमी आणि उमेदवारांची वारेमाप संख्या अशी विषम स्थिती गेल्या काही वर्षांत पाहायला मिळत आहे.
सरकारी नोकरी बरोबरच खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाणही कमी होताना दिसत होते. मात्र येणाऱ्या नवीन वर्षात काही प्रमाणात का होईना नोकऱ्यांची उपलब्धता होणार आहे. नवीन वर्षांत नोकरीच्या शोधात (Job Search) असलेल्या तरुणांसाठी आनंदवार्ता आहे. नवीन वर्षांत त्यांना अनेक संधी उपलब्ध होतील. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, तरुणांना टेलिकॉम (Telecom) आणि सेवा क्षेत्रात (Service Sector) नवीन संधी उपलब्ध होतील.
या क्षेत्रात बेरोजगारांची मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, त्यांना काही दिवसातच चांगल्या संधी उपलब्ध होतील. देशातील तरुणांना कौशल्य वाढविता येणार आहे. त्यांना प्रशिक्षणाची संधी मिळेल. त्यांना पदोन्नतीची संधी ही मिळेल. जॉब पोर्टल आणि कर्मचारी उपलब्ध करुन देणाऱ्या कंपन्यांच्या मते, भारतातील तरुणांना नवीन वर्षांत चांगल्या नोकऱ्या उपलब्ध असतील.
येत्या वर्षात नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण संमिश्र असेल. काही दिवसांपासून तंत्रज्ञान, दूरसंचार क्षेत्र आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजागाराच्या संधी वाढल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, पुढील वर्षातही याच क्षेत्रात महत्वपूर्ण जागा उपलब्ध होतील. या क्षेत्रात नवीन मनुष्यबळ लागेल. त्यामुळे या क्षेत्रात रोजागाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. रोजगार सेवा कंपनी टीमलीज सर्व्हिसेसने दावा केला आहे की, सेवा क्षेत्रात भारतात मार्च महिन्यापर्यंत अनेक रोजगार उपलब्ध होतील.
सोसायटी फॉर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे मुख्य कार्य अधिकारी आचल खन्ना यांनी नोकरीच्या संधीविषयी माहिती दिली. त्यानुसार, गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यंदा तंत्रज्ञान उद्योग सुस्त आहे. या क्षेत्रात भरती प्रक्रिया 18% घटली आहे. पण हा काळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे येत्या वर्षात या क्षेत्रात नोकरी मिळविणे आव्हानात्मक नसेल. अनेक संधी उपलब्ध असतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.