Tesla In India Dainik Gomantak
अर्थविश्व

Tesla In India: मस्कच्या टेस्लाची भारतात एन्ट्री; पुण्यातील ऑफिससाठी महिन्याला भरणार लाखो रुपये भाडे...

Elon Musk: चीनच्या BYD ऑटोमोबाईल्स कंपनीला सरकारने गेल्या आठवड्यात 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणुकी करण्यापासून रोखले होते.

Ashutosh Masgaunde

Elon Musk’s Tesla Has Rented An Office Space In Pune:

वादविवादानंतर, जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल कंपनी टेस्ला अखेर भारतात दाखल झाली असून, टेस्लाने पुण्यातील विमान नगरमध्ये आपले नवीन कार्यालय शोधले आहे.

जूनमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेस्लाचे मालक एलोन मस्क यांची भेट घेतली होती. तेव्हाच एलोन मस्क यांनी टेस्ला लवकरच भारतात आपले कार्यालय सुरू करणार असल्याचे सांगितले होते.

भारतात एलोन मस्क यांची कंपनी 'टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी' या नावाने व्यवसाय करणार असून, टेस्लाचे पुणे कार्यालय 5 हजार 850 स्क्वेअर फूट इतके आहे. ते पंचशील बिझनेस पार्कच्या पहिल्या मजल्यावर आहे.

भारतात गुंतवणुकीसाठी टेस्लासमोर रेड-कार्पेट टाकले होते. तर इलेक्ट्रिक वाहनांमधील सर्वात मोठा प्रतिस्पर्धी, चीनच्या BYD ऑटोमोबाईल्स कंपनीला सरकारने गेल्या आठवड्यात 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणुकी करण्यापासून रोखले होते.

चीनची इलेक्ट्रिक कार कंपनी BYD हे टेस्ला कंपनीसाठी मोठे आव्हान आहे, मात्र टेस्लाला सध्या भारतात कोणीही प्रतिस्पर्धी असणार नाही. मात्र थायलंडमध्ये चीनच्या BYD कंपनीचने टेस्लाला तगडे आव्हान असेल.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सदस्य जस्मिन खुराना म्हणाल्या होत्या, "इलेक्ट्रिक वाहनांच्या शर्यतीत भारतात जो कोणी जिंकेल तोच जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहनांच्या उद्योगाचा लिडर ठरेल."

भारत सरकार टेस्लाच्या परदेशी पुरवठादारांना, विशेषत: चीनी पुरवठादारांना देशात उत्पादन करण्याची परवानगी देऊ शकते. सरकारने याबाबत आपले कोणतीही पत्ते खुले केले नाहीत.

टेस्लाने 2019 मध्ये बेंगळुरूमध्ये आपली भारतीय उपकंपनी नोंदणी केली होती. याशिवाय देशात इलेक्ट्रिक वाहने आणि ईव्ही बॅटरी बनवण्यासाठी कारखाना उभारण्याची योजना आखण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT