Ambuja Cement Acquires Sanghi Industries: अदानींचा मोठा धमाका, हिंडेनबर्ग अहवालानंतर हजारो कोटींचा पहिला करार!

Adani Group Mega Deal: जानेवारी 2023 मध्ये हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली.
Gautam Adani
Gautam AdaniDainik Gomantak
Published on
Updated on

Adani Group Mega Deal: जानेवारी 2023 मध्ये हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. पण हळूहळू कंपनीच्या शेअर्सला उभारी मिळताना दिसत आहे.

आता अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंटने 5,000 कोटी रुपयांची मोठी डील दाखल केली आहे. या संपादनाची माहिती अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ट्विटरद्वारे दिली.

कराराचा एक भाग म्हणून, अंबुजा सिमेंटने सांघी इंडस्ट्रीजमधील 5,000 कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ मूल्याचे बहुसंख्य स्टेक ताब्यात घेण्याची घोषणा केली आहे. सांघी इंडस्ट्रीज ही पश्चिम भारतातील सर्वात मोठी सिमेंट उत्पादक कंपनी आहे.

56.74 टक्के हिस्सा ताब्यात घेतला

करारानंतर लगेचच, समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ट्विटरद्वारे सांगितले की, अंबुजा सिमेंट 2028 पर्यंत त्यांची सिमेंट क्षमता दुप्पट करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. पोर्टफोलिओमध्ये देशातील सर्वात कुशल अदानी समूहाच्या (Adani Group) अंबुजा सिमेंटच्या वतीने सांघी इंडस्ट्रीज लि. (SIL) विद्यमान प्रवर्तक, रवी सांघी आणि कुटुंबाकडून कंपनीतील 56.74 टक्के हिस्सा घेणार आहे.

Gautam Adani
Adani Group: अदानी पुन्हा किंग! कंपनीच्या नफ्यात तब्बल एवढ्या टक्क्यांची वाढ, शेअर्स वधारले!

अंबुजा ही अल्ट्राटेक नंतर दुसरी सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे

गुरुवारी सकाळी कंपनीच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या संपादनासाठी वित्तपुरवठा संपूर्णपणे अंतर्गत संसाधनांमधून केला जाईल.

हिंडेनबर्गच्या अहवालात अदानींच्या कंपन्यांवर आर्थिक अनियमिततेच्या आरोपानंतर समूहाने केलेला हा पहिलाच मोठा करार आहे. या करारामुळे अंबुजा सिमेंटची क्षमता वार्षिक 73.6 दशलक्ष टनांपर्यंत वाढण्यास मदत होईल.

अंबुजा ही अल्ट्राटेक नंतर दुसरी सर्वात मोठी सिमेंट उत्पादक कंपनी आहे. अदानी समूहाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अंबुजा सिमेंट आणि त्याच्या सहयोगी एसीसी लिमिटेडमध्ये बहुसंख्य हिस्सा घेऊन सिमेंट क्षेत्रात प्रवेश केला.

Gautam Adani
Adani Group: हिंडेनबर्गच्या अहवालानंतरही अदानींनी गाडले झेंडे; 'या' कंपनीने कमावला बंपर नफा!

निवेदनानुसार, SIL चे अधिग्रहण अंबुजा सिमेंट्स लिमिटेड (ACL) ला बाजारपेठेतील तिची स्थिती मजबूत करण्यास मदत करेल. यामुळे कंपनीची सिमेंट उत्पादन क्षमता 67.5 दशलक्ष टनांवरुन 73.6 दशलक्ष टन होईल.

गौतम अदानी (Gautam Adani) यांनी सांगितले की, 2028 पर्यंत समूह वेळेपूर्वी 140 दशलक्ष टन वार्षिक सिमेंट उत्पादन क्षमता गाठेल. अदानींनी पुढे सांगितले की, एसआयएलकडे एक अब्ज टन चुनखडीचा साठा आहे. अंबुजा सिमेंट पुढील 2 वर्षांत संघीपुरमची क्षमता वार्षिक 15 दशलक्ष टनांपर्यंत वाढवेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com