EV Sale In 2023 Dainik Gomantak
अर्थविश्व

Electric Vehicleच्या विक्रीचा 2023 मध्ये धुरळा, 365 दिवसांत 15 लाख वाहनांची विक्री

EV Sale In India: देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक बाइक्स महाराष्ट्रात आहेत. तर एकूण 7 लाख इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.

Ashutosh Masgaunde

Electric vehicle sales to peak in 2023, 15 lakh vehicles sold in 365 days:

भारतात इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. विक्रीचे ताजे आकडे हेच सूचित करतात. 2023 मध्ये देशातील इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वार्षिक आधारावर 49.25 टक्क्यांनी वाढून 15,29,947 युनिट्सवर पोहोचली आहे. फेडरेशन ऑफ व्हेईकल डीलर असोसिएशनने (FADA) ही माहिती दिली.

आकडेवारीनुसार, इलेक्ट्रिक वाहन उद्योगाने 2022 मध्ये एकूण 10,25,063 वाहनांची विक्री केली होती. 2023 मध्ये दुचाकी वाहनांची ईव्ही विक्री 36.09 टक्क्यांनी वाढून 8,59,376 युनिट्सवर पोहोचली आहे. 2022 मध्ये ती 6,31,464 युनिट होती.

बातमीनुसार, FADA च्या या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की, तीनचाकी इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वार्षिक आधारावर 65.23 टक्क्यांनी वाढून 5,82,793 युनिट्स झाली आहे, जी 2022 मध्ये 3,52,710 युनिट्स होती.

ई-व्यावसायिक वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या 2,649 युनिट्सच्या तुलनेत 114.16 टक्क्यांनी वाढून 5,673 युनिट्सवर गेली आहे. गेल्या वर्षी इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची विक्री 114.71 टक्क्यांनी वाढून 82,105 युनिट्सवर पोहोचल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

नोव्हेंबर महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांची (EV) विक्री उत्तम होती. ईव्ही विक्री (प्रवासी आणि व्यावसायिक) नोव्हेंबरमध्ये 25.5 टक्क्यांनी वाढून 1,52,606 युनिट्स झाली.

नोव्हेंबर 2022 मध्ये एकूण इलेक्ट्रिक वाहनांची किरकोळ विक्री 1,21,596 युनिट्स होती. ऑटोमोबाईल कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत भारतात इलेक्ट्रिक वाहनांची अनेक मॉडेल्स सादर केली आहेत. इलेक्ट्रिक वाहनांपासून ते लक्झरी इलेक्ट्रिक कारपर्यंत बाजारात आले आहेत. वाढती मागणी पाहता कंपन्याही या क्षेत्रात गुंतवणूक वाढवत आहेत.

उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा सर्वाधिक कल दिसून आला आहे. महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांची एकूण संख्या ४ लाखांवर पोहोचली आहे.

देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक बाइक्स महाराष्ट्रात आहेत. तर एकूण 7 लाख इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT