Electric Scooter Price: भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंट वेगाने लोकप्रिय होत आहे. खास करुन लोकांना इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यावर भर देतात.
दिग्गज खेळाडूंपासून ते स्टार्टअपपर्यंत अनेक ब्रँड इलेक्ट्रिक स्कूटर्स बाजारात विकत असले तरी ओला इलेक्ट्रिकने निर्माण केलेली लोकप्रियता ही सर्वात मोठी आहे.
ओलाच्या कॅब सेवेनंतर अलीकडेच इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये प्रवेश केलेल्या ओला इलेक्ट्रिकने एप्रिल महिन्यात 30,000 हून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत. यासह, ही देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी विक्री करणारी कंपनी बनली आहे.
एप्रिल महिन्यात विकल्या गेलेल्या वाहनांचा अहवाल सादर करताना ओला इलेक्ट्रिकने सांगितले की, कंपनीने या कालावधीत एकूण 30,000 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली आहे.
हा सलग आठवा महिना असुन ओला ही देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी विक्री करणारी कंपनी बनली आहे.
इलेक्ट्रिक स्कूटरच्या बाजारपेठेत कंपनीचा हिस्सा 40 टक्क्यांपर्यंत वाढल्याचा दावा कंपनीने केला आहे. म्हणजेच, उर्वरित 60 टक्के बाजारपेठ TVS, Ather Energy, Hero, Bajaj आणि Okinawa या सर्व ब्रँडच्या मालकीची आहे.
ओला इलेक्ट्रिकने 30,000 चा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या मार्चमध्ये कंपनीने एकूण 27,000 युनिट्सची विक्री केली होती. या अर्थाने कंपनीने मासिक विक्रीच्या बाबतीत 10 टक्के वाढ नोंदवली आहे.
कंपनी देशभरात आपल्या अनुभव केंद्रांची संख्या वाढवत आहे. ओलाचा दावा आहे की त्यांचे 90 टक्के वापरकर्ते ओला एक्सपीरिएंस केंद्राच्या 20 किलोमीटरच्या परिघात राहतात.
गोव्यात किती रूपयांना मिळेल इलेक्ट्रिक बाइक
OLA S1 Pro
बॅटरीची क्षमता- 4kWh
रेंज- 181 km
स्पीड- 116 kmph
किंमत- 1,24 999
OLAS1
बॅटरीची क्षमता- 2Kwh
रेंज- 91 km
स्पीड- 90 kmph
किंमत- 1,14, 999
OlA S1 Air
बॅटरीची क्षमता- 2kWh
रेंज- 85km
स्पीड- 85 kmph
किंमत- 99,999
OLA इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज
OLA च्या इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलिओमध्ये S1 Air, S1 आणि S1 Pro यांचा समावेश आहे. कंपनीच्या बेस मॉडेल S1 Air ची प्रारंभिक किंमत 84,999 रुपये, S1 मॉडेलची किंमत 99,999 रुपये आणि S1 Pro ची किंमत 1,24,999 रुपये आहे.
या तिन्ही स्कूटर अनुक्रमे 101 किमी, 128 किमी आणि 170 किमीच्या रेंजसह येतात. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर या स्कूटरच्या वास्तविक रेंजबद्दल माहिती देखील दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.