Ration Card: रेशनकार्डधारकांना मोठा झटका, आता मिळणार नाही मोफत रेशन; जारी झाली नवी गाईडलाइन!

Ration Card Update: रेशनकार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हीही कार्डधारक असाल तर आता तुम्हाला रेशनचा लाभ घेता येणार नाही.
Ration Card Holders
Ration Card HoldersDainik Gomantak
Published on
Updated on

Ration Card Update: रेशनकार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हीही कार्डधारक असाल तर आता तुम्हाला रेशनचा लाभ घेता येणार नाही. काही दिवसांपूर्वी रेशन दुकान चालकांच्या मनमानीच्या बातम्या आल्या होत्या, त्यानंतर सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

याप्रकरणी आता अन्न आणि पुरवठा विभाग कडक निर्णय घेत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात विभागाने नवा आदेश जारी केला आहे.

सर्व लोकांना या आदेशांचे पालन करावे लागेल, जे लोक सरकारी आदेशांचे पालन करणार नाहीत, त्यांना रेशनचा लाभ मिळणार नाही.

घरातून दुकान चालवता येणार नाही

सरकारी आदेशात असे सांगण्यात आले होते की, कोणताही रेशन दुकानदार त्याच्या घरातून दुकान ऑपरेट करणार नाही. कुटुंबातील सदस्यांना नामनिर्देशित करुनच पीओएस चालविण्याचा अधिकार दिला जाऊ शकतो.

Ration Card Holders
Ration Card: मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी मोठी अपडेट, आतापासून मिळणार कमी तांदूळ; सरकारने बदलला निर्णय

सरकार कठोर कारवाई करेल

यासोबतच, कोणत्याही प्रकारची गडबड आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे सरकारने (Government) म्हटले आहे. जर एखाद्या प्रभागात किंवा गावात पुरवठा केला गेला असेल, तर दुकानदाराला विभागाकडून नेमून दिलेल्या ठिकाणी बसूनच रेशनचे वाटप करता येईल.

मार्जिनची रक्कम बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली जाईल

विभागाच्या तपासणी दरम्यान जर कोणी रेशन दुकानदार अशी चूक करताना आढळून आला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. रेशन दुकानदारांना मिळणारी मार्जिन रक्कम ही विभागाकडूनच दिली जाते, ती फक्त सरकारी बँकेच्या (Bank) खात्यातच हस्तांतरित केली जाईल.

Ration Card Holders
Ration Card: मोफत रेशन घेणाऱ्यांची चांदी, सरकारकडून मिळणार जबरदस्त फायदा!

रेशनचे वाटप कुठून करता येईल

रेशन दुकानदारांना त्यांचा खाते क्रमांक, आधार कार्डची प्रत अर्जासोबत जोडून विभागाकडे जमा करावी लागणार आहे. यासोबतच रेशन दुकानदारांना नेमून दिलेल्या ठिकाणीच रेशनचे वाटप करावे लागणार आहे. ज्या ठिकाणी रेशनचे वाटप करण्यात आले आहे, त्या ठिकाणी ग्राहकांना रेशनचे वाटप केले जाईल, असे विभागीय आदेशात सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com