Internet In India Report 2022: इंटरनेटच्या युगात भारताने केला 'हा' अनोखा रेकॉर्ड, गोव्यात सर्वाधिक...

Internet in India Report 2022: भारतात इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत आहे. देशातील शहरांपेक्षा खेड्यांमध्ये इंटरनेटचा वापर जास्त होत आहे.
Internet In India Report 2022
Internet In India Report 2022Dainik Gomantak

Internet in India Report 2022: भारतात इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत आहे. देशातील शहरांपेक्षा खेड्यांमध्ये इंटरनेटचा वापर जास्त होत आहे, यावरुन याचा अंदाज लावता येतो.

एवढेच नाही तर देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या सक्रिय इंटरनेट वापरकर्ता आहे. 2025 पर्यंत भारतात सर्वाधिक इंटरनेटचा वापर वाढ होईल, असे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

दरम्यान, 52% भारतीय म्हणजे सुमारे 76 कोटी लोक सध्या सक्रियपणे इंटरनेट वापरत आहेत. भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.

अंदाजानुसार, 2025 पर्यंत 900 दशलक्ष भारतीय सक्रियपणे इंटरनेट वापरत असतील. अॅक्टिव्ह यूजर म्हणजे असे लोक जे महिन्यातून एकदा तरी इंटरनेट वापरतात. भारतात (India) एवढी वाढ पहिल्यांदाच झाली आहे.

Internet In India Report 2022
WhatsApp वर चुकूनही करू नका या 8 चुका, अन्यथा कायमसाठी होईल बॅन

दुसरीकडे, 'इंटरनेट इन इंडिया रिपोर्ट 2022' मध्ये ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) ने हा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या 76 कोटी इंटरनेट वापरकर्त्यांपैकी 40 कोटी ग्रामीण आणि 36 कोटी लोक शहरांमध्ये राहतात. म्हणजेच शहरांपेक्षा खेड्यांमध्ये इंटरनेटचा वापर जास्त आहे.

तसेच, गेल्या एका वर्षात शहरी भारतात इंटरनेटचा वापर 6% वाढला आहे, तर खेड्यात ही वाढ 14% आहे. 2025 पर्यंत, 56% नवीन इंटरनेट वापरकर्ते गावातील असतील.

गोव्यात (Goa) सर्वाधिक 70% लोक आणि बिहारमधील सर्वात कमी 32% लोक इंटरनेट वापरत आहेत. तर एकूण भारतीयांपैकी 54% इंटरनेट वापरकर्ते पुरुष आहेत. परंतु सामील होणाऱ्या नवीन वापरकर्त्यांपैकी 57% महिला आहेत.

Internet In India Report 2022
FASTag रिचार्ज करताना या चुका करू नका, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

असे मानले जाते की, 2025 पर्यंत, 65% नवीन वापरकर्ते महिला असतील. मोबाईल व्यतिरिक्त, टॅब्लेट किंवा स्मार्ट टीव्ही सारख्या स्ट्रीमिंग उपकरणांवर इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची संख्या एका वर्षात 8% वरुन 13% पर्यंत वाढली आहे. भारतातील डिजिटल पेमेंटमध्ये एका वर्षात 13% वाढ झाली आहे.

शिवाय, भारतात होत असलेल्या सर्व डिजिटल पेमेंटपैकी 99% UPI वापरकर्ते आहेत. गेल्या एका वर्षात डिजिटल पेमेंटच्या वापरात 13% वाढ झाली आहे. सुमारे 34 कोटी लोक डिजिटल पेमेंट वापरत आहेत, त्यापैकी 36% खेड्यातील आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com