Money Dainik Gomantak
अर्थविश्व

Stock Market: 20 वर्षीय विद्यार्थ्याने मार्केटमधून एका महिन्यात कमावले 664 कोटी

Earning From Stock Market: शेअर बाजारातून गुंतवणूकदार प्रचंड नफा कमावत आहेत.

दैनिक गोमन्तक

Earning From Stock Market: शेअर बाजारातून गुंतवणूकदार प्रचंड नफा कमावत आहेत. भारताशिवाय जागतिक बाजारपेठेतही गुंतवणूकदार करोडपती होत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा विद्यार्थ्याबद्दल सांगणार आहोत, ज्याने स्टॉक मार्केटमध्ये 215 कोटी रुपये गुंतवले आणि एक महिन्यानंतरच स्टॉक विकला. एका महिन्यात त्याला सुमारे 878 कोटी रुपये मिळाले, म्हणजेच या विद्यार्थ्याने अवघ्या एका महिन्यात 664 कोटी रुपये कमावले.

अमेरिकेतील विद्यार्थी

हे प्रकरण अमेरिकेतील (America) आहे. या 20 वर्षीय विद्यार्थ्याचे नाव 'जेक फ्रीमन', असे आहे. तो दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्याने (Student) बेड बाथ अँड बियॉन्ड कंपनीचे शेअर्स (Shares) खरेदी केले होते, ज्यातून त्याने करोडोंची कमाई केली.

440 रुपये दराने सुमारे 50 लाख शेअर्स खरेदी केले

या विद्यार्थ्याने 440 रुपये दराने सुमारे 50 लाख शेअर्स खरेदी केले होते. अवघ्या एका महिन्यात या शेअरचे मूल्य 2160 च्या पातळीवर पोहोचले, त्यानंतर जेकने हे शेअर्स विकले. जेकने सांगितले की, 'कुटुंबीयांकडून आणि मित्रांकडून पैसे घेऊन ते शेअर बाजारात गुंतवले होते.'

जेकने काही खास गोष्टी सांगितल्या

DailyMail.com ला दिलेल्या मुलाखतीत जेकने सांगितले की, 'पालकांना वाटते की, कदाचित माझे कोणीतरी अपहरण करेल, परंतु मला असे अजिबात वाटत नाही.' जेक पुढे म्हणाला की, 'काकांबरोबर शेअर्ससंबंधी चर्चा केल्यानंतर त्यांनी सुमारे 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT