Stock Market 'हा' स्टॉक्स अवघ्या 15 दिवसांत करेल तुम्हाला मालामाल

2021 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी चांगले होते. गेल्या वर्षी मल्टीबॅगर स्टॉक लिस्टमध्ये मोठ्या प्रमाणात स्टॉक्सनी प्रवेश केला होता.
Indian Stock Market
Indian Stock MarketDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Stock Market : 2021 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी चांगले होते. गेल्या वर्षी मल्टीबॅगर स्टॉक लिस्टमध्ये मोठ्या प्रमाणात स्टॉक्सनी प्रवेश केला होता. आता गुंतवणूकदार 2022 मध्ये चांगला परतावा देणारे स्टॉक शोधत आहेत. केवळ 15 ट्रेडिंग सत्रांमध्ये 153 टक्क्यांहून अधिक परतावा देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.

Indian Stock Market
घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने बदलू शकता पॅन कार्डमध्ये तुमचे आडनाव

आम्ही टेक्सटाइल स्टॉक- AK Spintex बद्दल बोलत आहोत. 3 जानेवारी 2022 रोजी या मल्टीबॅगर स्टॉकची किंमत 33.50 रुपये होती. 21 जानेवारी 2022 रोजी त्याची शेवटची किंमत 84.90 रुपये होती. म्हणजेच, जानेवारी महिन्याच्या 15 व्या ट्रेडिंग सत्रात, या समभागाने आपल्या भागधारकांना 153.43% इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 1 महिन्यात, AK Spintex स्टॉकची किंमत 24.35 रुपये वरून 84.90 रुपये पर्यंत वाढली आहे. या काळात या समभागाने आपल्या भागधारकांना 248.67% परतावा दिला आहे.

जर गुंतवणुकदाराने महिन्याभरापूर्वी या कापड स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची रक्कम 3.48 लाख रुपये झाली असती. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने नवीन वर्ष 2022 च्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी 3 जानेवारी रोजी 33.50 रुपयांच्या पातळीवर या टेक्सटाईल स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची रक्कम 2.53 लाख रुपये झाली असती. गेल्या एका आठवड्यात, हा मल्टीबॅगर स्टॉक सर्व ट्रेडिंग सत्रांमध्ये 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटला गेला आहे. या वर्षासाठी हा मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक मानला जाऊ शकतो.

Indian Stock Market
तुम्हाला गोल्ड, क्लासिक आणि प्लॅटिनम कार्डमधील फरक माहित आहे का?

AK Processors Pvt Ltd या नावाने आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून सुरू झाली होती. त्याची सुरुवात 6 ऑक्टोबर 1994 रोजी झाली. मानवनिर्मित कापडांवर प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने याची सुरुवात करण्यात आली. नंतर 6 जानेवारी 1995 रोजी कंपनीचे पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी रूपांतरित करण्यात आले. ऐंशीच्या दशकात वस्त्रोद्योग क्षेत्रात भरपूर संधी होत्या. वस्त्रोद्योग विकासावर सरकारने भर दिला. या संधीचा फायदा घेण्यासाठी कंपनीने कापड प्रक्रिया व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com