DoT Directed news rules for buying and selling news sim cards from 1 January 2024:
दूरसंचार विभागाने (DoT) सिमकार्ड खरेदी करण्यासाठी होणारी ऑफलाइन केवायसी प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
1 जानेवारी 2024 पासून लागू होणार्या या बदलाचे उद्दिष्ट प्रक्रिया सुव्यवस्थित करणे, दूरसंचार कंपन्यांचा खर्च कमी करणे आणि सिम फसवणुकीचा मुकाबला करून ग्राहकांची सुरक्षा सुधारणे हे आहे.
वास्तविक, आतापर्यंत सिम खरेदी करण्यासाठी कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी होत होती, जी एक महागडी आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे.
दूरसंचार विभागाने (DoT) यासंदर्भात आदेश जारी केले असून, 1 जानेवारीनंतर, नवीन सिमकार्ड खरेदी करताना, कस्टमला फक्त ई-केवायसी करावे लागेल.
सरकारने ऑगस्टमध्ये याबाबत नवीन नियम जाहीर केले होते, मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास विलंब झाला. एवढेच नाही तर नवीन नियमांनुसार सिमकार्ड विक्रेत्यांची पडताळणीही आवश्यक असणार आहे.
नवीन नियमांनुसार, सरकारने टेलिकॉम कंपन्यांसाठी फ्रँचायझी, वितरक आणि पॉइंट-ऑफ-सेल (PoS) एजंट्सची नोंदणी अनिवार्य केली आहे. या नोंदणीसाठी टेलिकॉम डीलर्स आणि एजंटना 12 महिन्यांचा वेळ मिळेल.
नियमांचे पालन करण्यात निष्काळजीपणा आढळल्यास सरकार 10 लाख रुपयांपर्यंत दंड करू शकते. बल्क सिमकार्ड जारी करण्याबाबत नवीन नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात सिमकार्ड खरेदी करण्यासाठी, तुमच्याकडे व्यवसाय कनेक्शन असणे आवश्यक आहे.
एका ग्राहकाला त्याच्या नावावर जास्तीत जास्त 9 सिमकार्ड खरेदी करता येतील. ग्राहकाने सिमकार्ड निष्क्रिय केल्यास, तो क्रमांक ९० दिवसांनंतर दुसऱ्या व्यक्तीला दिला जाईल. सिमकार्ड विक्रेत्यांना स्वतःची नोंदणी करण्यासाठी 12 महिन्यांचा कालावधी असेल, अन्यथा त्यांना दंड आणि तुरुंगातही पाठवण्याची तरतूद या नव्या नियमांत आहे.
दूरसंचार विभागाच्या नवीन नियमांनुसार आता सिमकार्ड विकण्यापूर्वी टेलिकॉम डीलर्स आणि एजंटना नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे.
आता कोणताही सामान्य वापरकर्ता मोठ्या प्रमाणात सिमकार्ड खरेदी करू शकणार नाही. फक्त व्यावसायिक कनेक्शनवरच मोठ्या प्रमाणात सिम खरेदी करण्याची परवानगी असेल.
पूर्वीप्रमाणेच, सामान्य वापरकर्ते अजूनही एका आधार आयडीवर 9 सिमकार्ड खरेदी करू शकतील.
दूरसंचार विभागाच्या नवीन नियमानुसार, जर एखाद्या व्यक्तीने आपला नंबर बंद केला, तर तो नंबर 90 दिवसांनंतरच दुसऱ्याला दिला जाईल.
सक्रिय क्रमांकावर नवीन सिमकार्ड खरेदी करायचे असल्यास, आता आधार स्कॅन केल्यानंतर ग्राहकाचा डेमोग्राफिक डेटाही घेतला जाईल.
सिमकार्डसाठी नवीन नियम लागू झाल्यानंतर डीलर्सना त्यांची पडताळणी करणे आवश्यक होणार असून, यासोबतच सिम विक्रीसाठीही नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.