Bank Of India ची FD वर खास ऑफर, ग्राहकांना 7.90 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवण्याची संधी

ही ऑफर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर मर्यादित काळासाठी आहे. या विशेष एफडीवर बँकेकडून कर्जाची सुविधाही दिली जात आहे.
Bank Of India|FD
Bank Of India|FDDainik Gomantak
Published on
Updated on

Bank Of India's special offer on FD, customers can get up to 7.90 percent interest:

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने सर्व ग्राहकांसाठी विशेष एफडी ऑफर जारी केली आहे.

या ऑफरमध्ये बँकेकडून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर गुंतवणूकदारांना 7.90 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही FD घेण्याचा विचार करत असाल तर हा एक चांगला पर्याय असू शकतो.

बँक ऑफ इंडियाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनुसार, या 2 वर्षांच्या विशेष मुदत ठेवी अंतर्गत अति ज्येष्ठ नागरिकांना 7.90 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के आणि सर्वसामान्य नागरिकांना 7.25 टक्के व्याज दिले जात आहे.

ही ऑफर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर मर्यादित काळासाठी आहे. या विशेष एफडीवर बँकेकडून कर्जाची सुविधाही दिली जात आहे.

Bank Of India|FD
Personal Loan चा EMI कमी करण्यासाठी बँक ऑफ बडोदाच्या 4 महत्त्वाच्या टिप्स

बँक ऑफ इंडियामध्ये एफडीचे व्याजदर

  • 7 दिवस ते 45 दिवस - 3.00 टक्के

  • ४६ दिवस ते १७९ दिवस – ४.५० टक्के

  • 180 दिवस ते 269 दिवस - 5.50 टक्के

  • 270 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी - 5.75 टक्के

  • 1 वर्षापासून 2 वर्षांपेक्षा कमी - 6.50 टक्के

  • 2 वर्षे - 7.25 टक्के

  • 2 वर्षांपेक्षा जास्त ते 3 वर्षांपेक्षा कमी - 6.75 टक्के

  • 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी - 6.50 टक्के

  • 5 वर्षे ते 10 वर्षे - 6.00 टक्के

Bank Of India|FD
गोव्यात सायबर गुन्हे वाढले; NCRB Data मधून समोर आली सायबर पोर्नोग्राफीची प्रकरणे

SBI मध्ये किती आहे एफडी वर व्याज?

सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये FD वर ७.१ टक्के इतका व्याजदर आहे. ही बँक तुम्हाला एका वर्षाच्या एफडीवर ६.८ टक्के, दोन वर्षांच्या एफडीवर ६.५ टक्के आणि पाच वर्षांच्या एफडीवर ६.५ टक्के व्याजदर देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com