LPG Price Hike News, LPG Price news updates Dainik Gomantak
अर्थविश्व

LPG Cylinder Rates: घरगुती एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला

4.2 किलो वजनाच्या सिलेंडरसाठी घरगुती लिक्विड पेट्रोलियम गॅसची किंमत 50 रुपयांनी वाढवण्यात आली आहे तसेच दरातील बदल आजपासून लागू होणार आहे.

दैनिक गोमन्तक

दिवसेंदिवस महागाई गगनाला भिडत आहे. गॅस, पेट्रोल-डिझेल, CNG, सोने यांच्या वाढत्या दरामुळे सामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे. अश्यातच आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीची बातमी समोर आली आहे. 4.2 किलो वजनाच्या सिलेंडरसाठी घरगुती लिक्विड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) ची किंमत 50 रुपयांनी वाढवण्यात आली आहे तसेच दरातील बदल आजपासून लागू होणार आहे. (LPG Cylinder Rates Updated News)

याशिवाय 5 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किंमतीत 18 रुपयांनी वाढ होईल. दिल्लीत आता घरगुती एलपीजीची किंमत 1053 रुपये असणार आहे. दरम्यान, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 8.5 रुपयांनी कपात करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या एका वर्षात, दिल्लीत घरगुती LPG सिलिंडरचे दर 834.50 रुपयांवरून 1003 रुपयांपर्यंत वाढण्यात आले. 14.2 kg घरगुती LPG सिलेंडरचा दर शेवटचा 19 मे 2022 रोजी 4 रुपयांनी वाढवला होता. तर 7 मे रोजी एलपीजी सिलिंडर 22 मार्च 2022 च्या 949.50 रुपयांच्या तुलनेत 50 रुपयांनी महाग झाला होता. याशिवाय, 22 मार्च 2022 रोजीही सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT