Airplanes Dainik Gomantak
अर्थविश्व

DGCA Latest Rule: हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी! या लोकांना विमानाने करता येणार नाही प्रवास

DGCA Latest Rule: विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. DGCA ने हवाई प्रवासाबाबत नवीन आदेश जारी केला आहे.

दैनिक गोमन्तक

DGCA Latest Rule: विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. DGCA ने हवाई प्रवासाबाबत नवीन आदेश जारी केला आहे, ज्या अंतर्गत काही लोकांना विमानाने प्रवास करता येणार नाही. DGCA ने हवाई प्रवासाच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता नव्या आदेशानुसार कोणताही दिव्यांग व्यक्ती विमानाने प्रवास करण्यास योग्य आहे की नाही, हे विमान कंपन्या ठरवणार नाहीत, तर डॉक्टर ठरवतील.

या प्रवाशांना विमानाने प्रवास करता येणार नाही!

खरेतर, नव्या नियमात डीजीसीएने म्हटले की, दिव्यांग व्यक्ती विमानाने प्रवास करण्यास योग्य आहे की नाही, हे एअरलाइन कंपन्या नव्हे तर डॉक्टर ठरवतील. डॉक्टरांनी एखाद्या प्रवाशाला अनफिट असल्याचे सांगितले तर तो प्रवासी (Passengers) प्रवास करु शकणार नाही. म्हणजेच डॉक्टरांना (Doctors) न सांगता आता विमान कंपनी प्रवाशाला प्रवास करण्यापासून रोखू शकत नाही. विमान कंपन्यांनी प्रवाशांशी गैरवर्तन करुन त्यांना विमानात चढण्यापासून रोखल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

डॉक्टर अंतिम शिक्का मारतील

विमान कंपन्यांचे नियामक असलेल्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने ( DGCA) विमान कंपन्यांना दिलेल्या या नवीन आदेशात असे म्हटले आहे की, 'विमान कंपनी अपंगत्वाच्या आधारावर कोणत्याही प्रवाशाला प्रवास करण्यास नकार देणार नाही. विमान प्रवासादरम्यान प्रवाशाची तब्येत बिघडू शकते असे एखाद्या विमान कंपनीला वाटत असेल, तर त्या प्रवाशाची डॉक्टरांकडून तपासणी करावी लागेल. डॉक्टर प्रवाशाच्या वैद्यकीय स्थितीबद्दल माहिती देतील. प्रवासी प्रवास करण्यास योग्य आहे की नाही हे फक्त डॉक्टरच सांगतील. विमान कंपन्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच निर्णय घेऊ शकतील.

जाणून घ्या हा निर्णय का घेतला गेला?

रांची विमानतळावरील विमान कंपनीने एका अपंग मुलाला विमानात बसण्यास नकार दिल्याची घटना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेचे सत्य बाहेर आल्यानंतर याला मोठा विरोध झाला. त्यानंतर इंडिगोच्या या कारवाईवर कठोरता दाखवत डीजीसीएने 5 लाखांचा दंडही ठोठावला होता. त्यानंतर आता डीजीसीएने हा आदेश जारी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT