Dark Edition Model twitter/@TataMotors_Cars
अर्थविश्व

TATA Motors च्या नवीन 'Dark Edition' मॉडेलचा जबराट लूक !

डार्क एडीशन (Dark Edition) मॉडेलच्या इंटेरिअर आणि एक्सटेरिअर अशा दोन्ही ठिकाणी काळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) नुकतेच आपल्या तीन गाड्यांचे 'डार्क एडिशन' (Dark Model) मॉडेल लॉन्च केले. या कारमध्ये अल्ट्रॉस, नेक्सॉन आणि हॅरियरचा समावेश आहे. या मॉडेल्समध्ये अल्ट्रोसची किंमत 8.71 लाख रुपये, नेक्सॉनची किंमत 10.40 लाख रुपये तर हॅरियरची किंमत 18.04 लाख रुपये अशी असणार आहे. नेक्सन ईव्ही डार्क एडिशनची किंमत 15.99 लाख रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मॉडेल्सची डिलिव्हरीदेखील सुरू करण्यात आली आहे. (Delivery of Dark Edition model started by TATA Motors)

डार्क एडीशन मॉडेलच्या इंटेरिअर आणि एक्सटेरिअरमध्ये काळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. या रंगाची ग्राहकांमध्ये मोठी क्रेझ असुन, काही ग्राहकांनी या कार बुक सुद्धा केल्या आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने अल्ट्रॉस हे प्रीमियम हॅचबॅक मॉडेल आहे. टॉप ऑफ लाईन व्हॅरिएंटला कॉस्मो ब्लॅक रंग देण्यात आला आहे. ज्यामध्ये R16 अ‍ॅलॉय व्हील्सवर डार्क टिंट फिनिश आहे आणि पूर्ण हूडमध्ये प्रीमियम डार्क क्रोम लावण्यात आला आहे. पेट्रोल (NA आणि I Turbo) एक्सझेड + च्या टॉप व्हेरिएंटमध्ये अल्ट्रॉस डार्क उपलब्ध असेल. त्याची किंमत 8.71 लाख रुपये एवढी असणार आहे.


टाटा हॅरियर

टाटा हॅरियरचे 3 ट्रिम XT+, XZ + आणि XZ+ डार्क एडिशनमध्ये उपलब्ध असणार आहेत. ज्यामधून ग्राहक त्यांच्या आवडीचे मॉडेल निवडू शकतात. तर या मॉडेलची किंमत 18.04 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

टाटा नेक्सन

नेक्सॉनचे डार्क एडिशन XZ +, XZA +, XZ + (O) आणि XZA + (O) व्हेरिएंटमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंधन या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT