Delhi CM Arvind Kejriwal Dainik Gomantak
अर्थविश्व

Delhi Government: केजरीवाल सरकार कर्मचाऱ्यांच्या दारी! 5 महिन्यांनी घेतला असा निर्णय

Salary Hike: किमान वेतन वाढीमुळे कर्मचाऱ्यांना महागाईच्या काळात दिलासा मिळणार आहे.

दैनिक गोमन्तक

Delhi Government: दिवाळीच्या आधी, केजरीवाल सरकारने अकुशल कामगार, कुशल कामगार आणि अर्धकुशल कामगारांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियो यांनी बुधवारी ही माहिती दिली. मनीष सिसोदिया म्हणाले की, 'किमान वेतन वाढीमुळे कर्मचाऱ्यांना महागाईच्या काळात दिलासा मिळणार आहे.' मासिक वेतनात सुधारणा करण्याचा निर्णय दिवाळीपूर्वी आला असून तो 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. सरकारने यापूर्वी मे महिन्यात वेतनात वाढ केली होती.

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया काय म्हणाले?

किमान वेतनवाढीमुळे महागाईच्या (Inflation) विपरीत परिणामांनी त्रस्त कामगार वर्गाला दिलासा मिळणार आहे. मनीष सिसोदिया म्हणाले की, 'दिल्ली सरकार देशातील मजुरांपेक्षा सर्वात जास्त वेतन देते.' उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, 'या पाऊलामुळे दिल्ली (Delhi) सरकारच्या सर्व अनुसूचित रोजगार श्रेणीतील अकुशल, अर्ध-कुशल, कुशल आणि इतर कामगारांना फायदा होईल.' याचा फायदा लिपिक आणि पर्यवेक्षकीय नोकऱ्यांनाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, लिपिक आणि पर्यवेक्षकीय नोकऱ्यांसाठी किमान वेतन देखील वाढविण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री पुढे असेही म्हणाले की, 'असंघटित क्षेत्रातील किमान वेतनावर काम करणाऱ्या लोकांनाही महागाई भत्त्याचा लाभ मिळायला हवा, जो सामान्यतः राज्य आणि केंद्र सरकारच्या (Central Government) कर्मचाऱ्यांना दिला जातो.'

मनीष सिसोदिया शेवटी म्हणाले की, 'सर्व कर्मचाऱ्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी दिल्ली सरकार दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्यात सुधारणा करत आहे. ऑगस्ट मधील 7.62% च्या तुलनेत सप्टेंबर 2022 मध्ये महागाई 8.60% पर्यंत वाढली आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT