7th Pay Commission: मोदी सरकार कर्मचाऱ्यांना ओवाळी! DA वाढीनंतर आणखी एक मोठी भेट

Central Govt Employees: मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर आता आणखी एक भेट देण्यात आली आहे.
7th Pay Commission Update
7th Pay Commission Update Dainik Gomantak

LTC Facility: मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर आता आणखी एक भेट देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत सरकारने कर्मचाऱ्यांचा डीए 34 वरुन 38 टक्के केला आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या घरात केंद्र सरकारचा कर्मचारी असेल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच आनंदित करेल. नवीन निर्णयानुसार, केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना जम्मू आणि काश्मीर, अंदमान आणि निकोबार बेटे, लडाख आणि ईशान्येकडील प्रवासासाठी रजा प्रवास सवलत (LTC) ची सुविधा दोन वर्षांसाठी वाढवली आहे.

या तारखेपर्यंत लाभ मिळेल

सरकारच्या (Government) नवीन निर्णयानंतर, सर्व पात्र केंद्रीय कर्मचारी 25 सप्टेंबर 2024 पर्यंत ही सुविधा घेऊ शकतील. कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात सांगण्यात आले की, रजा प्रवास सवलत (LTC) योजना 26 सप्टेंबर 2022 ते 25 सप्टेंबर 2024 पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी वाढवण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत केंद्र सरकारच्या (Central Government) पात्र कर्मचाऱ्यांना (Employees) एलटीसीवर प्रवास करताना पगारी रजा मिळते आणि प्रवासाच्या तिकिटासाठी पैसेही मिळतात.

7th Pay Commission Update
7th Pay Commission DA Hike: RJ, KA, DL नंतर झारखंडने दिली सरकारी कर्मचाऱ्यांना भेट

विमानाने प्रवास करण्याची परवानगी

आदेशात पुढे म्हटले की, पात्र केंद्र सरकारी कर्मचारी जम्मू आणि काश्मीर, ईशान्यकडील राज्ये, लडाख आणि अंदमान आणि निकोबारमध्ये प्रवास करण्यासाठी एलटीसी सुविधेचा लाभ घेऊ शकतात. एवढेच नाही तर जे सरकारी कर्मचारी विमान प्रवासासाठी पात्र नाहीत त्यांनाही या राज्यांमध्ये विमानाने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ते त्यांच्या मुख्यालयातून थेट जम्मू आणि काश्मीर, अंदमान आणि निकोबार बेटे आणि ईशान्येकडे कोणत्याही विमान कंपनीने इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करु शकतात.

7th Pay Commission Update
7th Pay Commission: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट, DA नंतर DR मध्ये 4 टक्के वाढ

त्याचबरोबर, एलटीसीचा गैरवापर केल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल आणि कर्मचाऱ्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. 2020 मध्ये देखील केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना उपलब्ध असलेल्या या सुविधेचा कालावधी दोन वर्षांसाठी वाढवला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com