Money  Dainik Gomantak
अर्थविश्व

Dearness Allowance: केंद्राच्या घोषणेनंतर या राज्यानेही वाढवला कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता

DA Incremaent for Government Employees: राजस्थान सरकारने आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

Dearness Allowance in Rajasthan: केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केल्याची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारांवरही दबाव वाढला आहे. केंद्राच्या घोषणेनंतर काही तासांनंतर राजस्थान सरकारने आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. हा महागाई भत्ता यावर्षी जुलैपासून दिला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

कर्मचाऱ्यांना जुलैपासून वाढीव महागाई भत्ता मिळणार

राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, 'केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने निवृत्तीवेतनधारकांना देय असलेला महागाई भत्ता 4 टक्क्यांनी मंजूर करण्यात आला आहे. आता 1 जुलै 2022 पासून राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 38 टक्के महागाई (Inflation) भत्ता मिळेल. यापूर्वी महागाई भत्त्याचा दर 34 टक्के होता.'

सरकारवर 1,096 कोटींचा अतिरिक्त बोजा

केंद्र सरकारची (Central Government) खिल्ली उडवत सीएम गेहलोत म्हणाले की, 'केंद्र सरकार महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करते, मात्र त्याची अंमलबजावणी बऱ्याच दिवसांनी होते. त्याच वेळी, राजस्थान सरकार विलंब न करता वाढीव रक्कम वितरित करते.' कर्मचाऱ्यांच्या हितासाठी बुधवारी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या निधीतून 1,096 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा करण्यात आली. केंद्राच्या या निर्णयामुळे देशातील सुमारे 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. केंद्राचा हा निर्णय केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट मानला जात आहे. या निर्णयानंतर आता राज्य सरकारेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात गुंतली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT