Ashwini Vaishnav Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार भाड्यात सवलत!

IRCTC: रेल्वेने जाहीर केलेल्या कमाईच्या आकड्यांमध्ये प्रवासी भाडे आणि मालवाहतूक या दोन्हींमध्ये वाढ झाली आहे.

Manish Jadhav

Indian Railways Plan: भारतीय रेल्वेने 2022-23 या आर्थिक वर्षातील कमाईचा रेकॉर्ड मोडला आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या कमाईच्या आकड्यांमध्ये प्रवासी भाडे आणि मालवाहतूक या दोन्हींमध्ये वाढ झाली आहे.

कमाईचे आकडे आणखी वाढवण्यासाठी रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, रेल्वेने वाहतुकीतील वाटा वाढवण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी 84,000 बोग्यांची ऑर्डर दिली आहे. रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी ही माहिती दिली आहे.

मालवाहतुकीत वाटा वाढवण्याचे लक्ष्य

येत्या काही दिवसांत रेल्वेच्या उत्पन्नात वाढ झाल्यावर ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) भाड्यात दिलेली सूट पुन्हा पूर्ववत होऊ शकते. रेल्वेने 2030 पर्यंत मालवाहतुकीचा वाटा 45 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी यावर्षी सुमारे 84 हजार बोगींची ऑर्डर देण्यात आली असून, हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे.

27 वरुन 45 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट

रेल्वे राज्यमंत्री म्हणाले की, रेल्वे वाहतुकीचा वापर सामान्यतः मोठ्या प्रमाणात माल वाहून नेण्यासाठी केला जातो. मात्र आता रस्त्याने वाहतूक करता येणारी अनेक उत्पादने रेल्वेतून कंटेनरमध्ये नेली जात आहेत.

जरदोश पुढे म्हणाले की, “या सर्व गोष्टी लक्षात घेऊन 2030 पर्यंत मालवाहतुकीतील रेल्वेचा वाटा 27 टक्क्यांवरुन 45 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी मुळात चार गोष्टी – ट्रॅकची उपलब्धता, बोगी आणि रॅक, टर्मिनलची उपलब्धता, याशिवाय विविध वाहतूक योजनांची आवश्यकता असेल.

त्याचबरोबर, गेल्या आठ वर्षांत या सर्व मुद्यांवर सरकारने (Government) भर दिल्याचे ते म्हणाले. 2014 ते 2021-22 या काळात दररोज सात किलोमीटरच्या आधारे रेल्वे ट्रॅकला मंजूरी देण्यात आली होती आणि आता ती वाढून 12 किलोमीटर प्रतिदिन झाली आहे.

जलद गतीने पूर्ण होत असलेले प्रकल्प देशाच्या प्रत्येक भागाला जोडण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे 61 टक्के कामही पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. जेव्हा ते पूर्णपणे बांधले जाईल, तेव्हा मालवाहतूक खूप वेगवान होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: 6 महिन्यांमध्ये 10 कोटींचे लक्ष्य! मडगाव पालिकेने कसली कंबर; 35 कोटी थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट्य

Priol: प्रियोळात सत्तेसाठी चढाओढ सुरू! माशेल, खांडोळा, भोम पंचायतीत अस्थिरता; ग्रामस्थांत नाराजीचा सूर

Goa Cruise Tourism: क्रूझवरुन गोव्यात 67,594 प्रवासी, 9 महिन्यांत कमावलं 4.82 कोटींचं उत्पन्न; मुरगाव बंदर बनलं क्रूझ पर्यटनाचं केंद्र

Lok Sabha in Konkani: वाल्लोर! लोकसभेचं कामकाज कोकणीत होणार; इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 'गोव्याचा' आवाज दुमदुमणार

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

SCROLL FOR NEXT