money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डबल धमाका, महागाई भत्त्यात 3% वाढ

7th Pay Commission​/ DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission​/ DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवरात्रीपूर्वी सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली आहे. कर्मचारी अनेक दिवसांपासून महागाई भत्त्याची वाट पाहत होते, मात्र यावेळी सरकार किती टक्के महागाई भत्ता वाढवणार याचा निर्णय झालेला नाही.

सरकारने जाहीर केले

ओडिशा (Odisha) सरकारने सोमवारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सोमवारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. सरकारने जारी केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार, महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ मंजूर करण्यात आली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळेल

नव्या घोषणेमध्ये सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई (Inflation) भत्ता सध्याच्या 31 टक्क्यांवरुन 34 टक्के करण्यात आल्याचे म्हटले आहे. वाढीव महागाई भत्ता 1 जानेवारी 2022 पासून लागू असल्याचे मानले जाईल. म्हणजेच यासह कर्मचाऱ्यांना 8 महिन्यांची थकबाकीही मिळणार आहे. ओडिशा सरकारच्या या निर्णयामुळे 4 लाख कर्मचारी आणि 3.5 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. सरकारने एक अधिसूचना जारी करुन सांगितले की, जानेवारी ते ऑगस्ट महिन्यातील महागाई भत्त्याची थकबाकी कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे दिली जाईल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने डीए

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील सध्या 34% आहे. म्हणजेच आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही केंद्र सरकारच्या (Central Government) कर्मचाऱ्यांइतकाच महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे.

डीए वाढीच्या प्रतीक्षेत केंद्रीय कर्मचारी

या महिन्याच्या अखेरीस केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते. वास्तविक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता AICPI च्या डेटावर अवलंबून असतो. AICPI च्या आकडेवारीच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अद्याप त्याची घोषणा झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT