ICICI Bank UPI Scam Alert Dainik Gomantak
अर्थविश्व

UPI Scam द्वारे ग्राहकांच्या बँक खात्यांवर सायबर चोरट्यांचा डल्ला, ICICI बँकेने दिला इशारा

ICICI Bank UPI Scam Alert: स्कॅमर यूजर्सच्या डिव्हाइसवर UPI नोंदणी करतात आणि काही काळानंतर, यूजर्सना कळते की त्यांच्या बँक खात्यातून पैसे चोरीला गेले आहेत.

Ashutosh Masgaunde

Cyber criminals are targeting the UPI app with the help of malware and stealing money from the accounts, ICICI bank sent mail to its customers:

ICICI बँकेने आपल्या सर्व ग्राहकांना 'नवीन UPI ​​ॲप' घोटाळ्याबाबत सावध केले आहे. ऑनलाइन बँकिंग आणि विशेषत: विविध UPI ॲप्स वापरणाऱ्यांसाठी हा इशारा देण्यात आला आहे.

बँकेने आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, सायबर चोरटे मालवेअरच्या मदतीने UPI ॲपला लक्ष्य करत आहेत आणि खात्यांमधून पैसे चोरत आहेत.

आयसीआयसीआय बँकेचे म्हणणे आहे की, मालवेअरच्या मदतीने UPI ॲप्लिकेशनला लक्ष्य केले जात आहे. याबाबत बँकेने आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे. ICICI बँकेने बँकिंग यूजर्सना ई-मेल पाठवून सतर्क केले आहे.

बँकेने या मालवेअरबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि ग्राहकांना याबाबत खूप काळजी घेण्यास सांगितले आहे. UPI नोंदणीच्या वेळी व्हर्च्युअल मोबाईल नंबर (VMN) द्वारे हा घोटाळा केला जात आहे.

सायबर गुन्हेगार कस्टम एसएमएस फॉरवर्डिंग ॲप्स तयार करतात. सोप्या भाषेत, जेव्हा तुम्ही नवीन डिव्हाइसवर UPI नोंदणी करता तेव्हा व्हर्च्युअल मोबाइल नंबरवर एक संदेश पाठवला जातो.

यानंतर, नवीन डिव्हाइसवर UPI नोंदणी केली जाते. यासह, स्कॅमर त्यांच्या डिव्हाइसवर UPI नोंदणी करतात आणि काही काळानंतर, यूजर्सना कळते की त्यांच्या बँक खात्यातून पैसे चोरीला गेले आहेत.

फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?

  1. नव्या ऑपरेटिंग सिस्टम आणि सुरक्षा पॅचसह मोबाईल डिव्हाइसेस अपडेट ठेवा.

  2. Google Play आणि Apple App Store सारख्या विश्वसनीय स्त्रोतांमधूनच ॲप्स डाउनलोड करा.

  3. विश्वासू प्रदात्याकडूनच अँटीव्हायरस/सेफ्टी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा.

  4. ईमेल किंवा मेसेजमधील संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. अज्ञात ॲप्स डाउनलोड करणे टाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT