Crypto Price Today Dainik Gomantak
अर्थविश्व

Crypto Price Today: क्रिप्टो 20,000 च्या खाली, इथरियम, सोलाना, शिबा इनू हिरवीगार

क्रिप्टोकरन्सी मार्केट सध्या शांत आहे. येथे कोणतीही मोठी हालचाल झाली नाही.

दैनिक गोमन्तक

क्रिप्टोकरन्सी मार्केट सध्या शांत आहे. येथे कोणतीही मोठी हालचाल झाली नाही. बुधवारी अमेरिकेत चलनवाढीची आकडेवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. चलनवाढीत थोडीशी वाढ झाल्यास मध्यवर्ती बँक व्याजदरात आणखी वाढ करू शकते, हे पाहता क्रिप्टो मार्केट सध्या शांत आहे. कोणताही खास उतार चढाव बघायला मिळत नाही. (Cryptocurrency Price Today)

याआधी बुधवारी, सर्व क्रिप्टोकरन्सी हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसल्या होत्या. परंतु बिटकॉइन अजूनही $20,000 च्या खाली व्यापार करत आहेत. इथरियम, सोलाना आणि शिबा ईनु सारख्या क्रिप्टोकरन्सीजमध्येही किंचित वाढ झाल्याची दिसत आहे.

जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजार $871.69 अब्जच्या खाली व्यापार करत आहे. गेल्या 24 तासांत त्यात दोन टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. मात्र, क्रिप्टोकरन्सीच्या एकूण व्यापाराचे प्रमाण 4 टक्क्यांनी वाढून $55.5 अब्ज झाले आहे.

Coinmarketcap नुसार, Quant (QNT), Serum (SRM) आणि STEPN (GMT) ही गेल्या 24 तासांत सर्वाधिक वाढणाऱ्या तीन नाण्यांपैकी आहेत. गेल्या 2 दिवसांप्रमाणे आजही सर्वाधिक वाढणाऱ्या चलनाने फारशी झेप घेतली नाही. क्वांट (QNT) मध्ये एका दिवसात केवळ 7.66% वाढ झाली आहे. ती आज $83.22 वर व्यापार करत आहे. सीरम (SRM) आज 7.22 टक्क्यांनी वाढला आहे आणि त्याची बाजार किंमत $1.02 आहे. STEPN (GMT) $ 0.8611 वर आज 2.10% वर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT