India-Pakistan Trade Dainik Gomantak
अर्थविश्व

India-Pakistan Trade: सीमेवर संघर्ष, पण व्यापारात नफा; भारत-पाकिस्तान व्यापाराची आकडेवारी घ्या जाणून...

केंद्र सरकारने संसदेत दिली माहिती, 2021 च्या तुलनेत दुप्पट वाढ

Akshay Nirmale

India-Pakistan Trade: एरवी पाकिस्तानकडे आपले शत्रू राष्ट्र म्हणून पाहिले जात असले तरी भारत-पाकिस्तानमध्ये व्यापारही होत असतो. गतवर्षात या व्यापाऱ्याने 1.35 अब्ज डॉलर्सची पातळी गाठली आहे.

म्हणजे भारतीय रूपयांत विचार करायचा झाल्यास 1,11,54,51,00,000 रूपयांचा व्यापार गतवर्षी एप्रिल ते डिसेंबर या काळात दोन्ही देशांमध्ये झाला आहे.

वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत लेखी उत्तरातून ही माहिती दिली आहे. पटेल यांनी सांगितले की, एप्रिल ते डिसेंबर 2022 या काळात दोन्ही देशांत एकूण $1.35 अब्ज डॉलरचा व्यापार झाला, जो 2021-22 या आर्थिक वर्षातील $516.36 दशलक्षच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे.

यासोबतच त्यांनी भारताच्या चीनसोबतच्या व्यापाराचा लेखाजोखाही संसदेसमोर मांडला. एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये भारत आणि चीनमध्ये एकूण $87 अब्ज डॉलरचा व्यापार झाला आहे.

भारत-पाकिस्तानमधील व्यापारात वाढ

भारत-पाकिस्तान व्यापाराबद्दल बोलायचे झाले तर, 2019 नंतर दोन्ही देशांमधील व्यापारात सर्वाधिक वाढ झाली आहे. 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने अधिकृतपणे भारतासोबतचा व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर दोन्ही देशांमधील व्यापारात वाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील व्यापार जवळपास थांबला होता. अर्थात यात भारतापेक्षा जास्त नुकसान पाकिस्तानचेच होत होते. कारण पाकिस्तान बऱ्याच गोष्टींसाठी भारतावर अवलंबून होता.

2019-20 मध्ये किती व्यवसाय झाला?

2020-21 या आर्थिक वर्षात केवळ 329.26 दशलक्ष डॉलरचा व्यवहार झाला. तर 2019-20 मध्ये ते 830.58 अब्ज डॉलर होते. 2021-22 या आर्थिक वर्षात ते 516.36 दशलक्ष डॉलर इतका वाढला होता. आता एप्रिल ते डिसेंबर 2022 या काळात हा व्यापार 1.35 अब्ज डॉलरपर्यंत वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT