Disney Layoffs: 'या' कारणामुळे Disney कंपनीतून 7,000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता...

डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मचा नेटफ्लिक्स हा प्रमुख प्रतिस्पर्धी आहे
Disney hotstar
Disney hotstar Dainik Gomantak

Disney Layoffs 2023: जगभरात मंदीच्या पार्श्वभुमीवर अनेक टेक कंपन्या कर्मचारी कपात करत असताना कर्मचारी कपातीचे हे लोन आता मनोरंजन उद्योगातही आले आहे.

एंटरटेनमेंट जायंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिस्नी कंपनीनेही एकाच झटक्यात 7,000 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनीचे सीईओ बॉब इगर यांनी या निर्णयाची माहिती दिली.

अर्थव्यवस्था सध्या मंद गतीने वाढत असल्याने अमेरिकेतील अनेक टेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचे निर्णय घेतले आहेत. कोरोनाकाळानंतर नोकरभरतीचा वेगही कमी झाला आहे.

Disney hotstar
Valentine Day: 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी गाईला मिठी मारा, प्राणी कल्याण मंडळाचे अनोखे आवाहन

नुकतेच डिस्नी कंपनीने त्यांचा तिमाही अहवाल प्रसिद्ध केला. त्याच्या विश्लेषणानंतर सीईओ बॉब इगर म्हणाले की, मी हा निर्णय जड अंतकरणाने घेतला आहे. आमच्या जगभरातील कर्मचार्‍यांची प्रतिभा आणि समर्पणाबद्दल मला प्रचंड आदर आणि कौतुक आहे.

तथापि, ट्रेड विश्लेषकांनी मोठ्या प्रमाणात घट होण्याची अपेक्षा केली होती. विशेष म्हणजे त्यानंतरही डिस्नीच्या शेअरची किंमत आठ टक्के जास्त राहिली.

कंपनीच्या 2021 च्या वार्षिक अहवालानुसार, त्या वर्षात 2 ऑक्टोबरपर्यंत कंपनीने जगभरात 1,90,000 लोकांना रोजगार दिला, ज्यापैकी 80 टक्के पूर्णवेळ होते.

वॉल्ट डिस्ने यांनी स्थापन केलेल्या कंपनीने म्हटले आहे की, गेल्या तिमाहीत त्यांच्या स्ट्रीमिंग सेवेने प्रथमच ग्राहकांमध्ये घट झाली. कारण ग्राहकांनी मनोरंजनावरील खर्च कमी केला आहे.

डिस्नी + चे सबस्कायबर्स ३१ डिसेंबर रोजी 168.1 मिलियन इतके होते. त्यापुर्वीच्या तीन महिन्यांतील डिस्नी + च्या सबस्क्रायबर्सची तुलना करता १ टक्क्यांची घट झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कंपनीला १ बिलियन डॉलरचा तोटा झाला.

तथापि, डिस्नी समुहाने तीन महिन्यांत 23.5 अब्ज डॉलरची कमाई केली आहे, जी विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा चांगली आहे.

Disney hotstar
स्मृती इराणींच्या मुलीचे राजस्थानमध्ये होणार ग्रॅन्ड लग्न, गोव्यातील सिली सोल्समुळे सापडली होती वादात

खरे तर इगर यांनी दोन दशके या कंपनीचे नेतृत्व केल्यानंतर 2020 मध्ये सीईओ पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर संचालक मंडळाने त्यांच्या जागी बॉब चापेक यांची निवड केली होती. पण त्यांना खर्चावर लगाम घालण्यात अपयश आल्यानंतर पुन्हा इगर यांना सीईओ केले गेले.

एकीकडे डिस्नीला संघर्ष करावा लागत असतानाच त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी नेटफ्लिक्सने स्वतःला बॅडपॅचमधून बाहेर काढत गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात नवीन सबस्क्रायबर्स जोडल्याची घोषणा केली होती. खर्चावर लगाम घालण्यासाठी नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंग थांबवले होते.

नेटफ्लिक्सने कॅनडा, न्यूझीलंड, पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये पासवर्ड शेअरिंग थांबवले आहे. याबाबतच जगभरातच नेटफ्लिक्स आता नवे धोरण घेऊन येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com