CNG PNG Price  Dainik Gomantak
अर्थविश्व

CNG-PNG स्वस्त, महानगर गॅसने केली दर कपातीची घोषणा; जाणून घ्या नवीन दर

मुंबईला गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली

दैनिक गोमन्तक

CNG-PNG Price: वेगाने वाढणाऱ्या महागाईच्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी समोर आली आहे. मुंबईला गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे . सरकारने देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवल्यानंतर, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

अधिकृत निवेदनानुसार, पीएनजीची किंमत 4 रुपये प्रति घनमीटरने कमी करून 48.50 रुपये करण्यात आली आहे . त्याचवेळी, सीएनजीच्या दरात प्रति किलो 6 रुपयांनी कपात करून 80 रुपये प्रति किलो झाली आहे. MGL ने एका निवेदनात म्हटले आहे की, किमतीच्या सुधारणेनंतर, देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील वाहन मालक इतर इंधनांच्या तुलनेत CNG च्या किमतीत 48 टक्के बचत करू शकतील . दुसरीकडे, पीएनजीच्या बाबतीत, ग्राहकांना सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) च्या तुलनेत 18 टक्के बचत मिळेल.

मुंबईशिवाय पुण्यातही सीएनजीच्या दरात कपात करण्यात आली आहे. पुण्यात सीएनजीच्या दरात 1 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. या कपातीनंतर आता पुण्यात एक किलो सीएनजीचा दर 87 रुपयांवर पोहोचला आहे. ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT