PM Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Gratuity And Pension Rule: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, पेन्शन अन् ग्रॅच्युइटी होणार बंद !

Gratuity And Pension New Rule: केंद्रीय कर्मचार्‍यांना डीए आणि बोनस दिल्यानंतर आता सरकार 18 महिन्यांची थकबाकी देण्याचा विचार करु शकते.

दैनिक गोमन्तक

Gratuity And Pension New Rule: केंद्रीय कर्मचार्‍यांना डीए आणि बोनस दिल्यानंतर आता सरकार 18 महिन्यांची थकबाकी देण्याचा विचार करु शकते, परंतु दरम्यान, सरकारने एक मोठा नियम बदलला आहे. वास्तविक, सरकारनेही कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद दिली असून, कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास निवृत्तीनंतरच्या निवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युइटीपासून वंचित राहावे लागेल. म्हणजेच, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

वास्तविक, सरकारने कर्मचाऱ्यांना (Employees) कामाबाबत इशारा दिला आहे. सरकारच्या नव्या नियमांनुसार, एखाद्या कर्मचाऱ्याने कामात हलगर्जीपणा केल्यास निवृत्तीनंतर त्याची पेन्शन आणि ग्रॅच्युइटी थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा आदेश केंद्रीय कर्मचार्‍यांना लागू राहील, परंतु पुढे जाऊन राज्येही त्याची अंमलबजावणी करु शकतात.

अधिसूचना जारी केली

केंद्र सरकारने (Central Government) अलीकडेच केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम 2021 अंतर्गत अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारने अलीकडेच CCS (पेन्शन) नियम 2021 चा नियम 8 बदलला आहे, ज्यामध्ये अनेक नवीन तरतुदी करण्यात आल्या आहेत. या अधिसूचनेमध्ये असे म्हटले की, केंद्रीय कर्मचाऱ्याने त्याच्या कार्यकाळात कोणताही गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणा दाखवल्यास निवृत्तीनंतर त्याची ग्रॅच्युइटी आणि पेन्शन बंद केली जाईल.

विशेष म्हणजे, बदललेल्या नियमांची माहिती केंद्राने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पाठवली आहे. एवढेच नव्हे तर दोषी कर्मचाऱ्यांची माहिती मिळाल्यास त्यांचे पेन्शन आणि ग्रॅच्युइटी रोखण्याची कारवाई करण्यात यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच, सरकार यावेळी या नियमाबाबत सक्त झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT