Gratuity New Rules: कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले! आता 1 वर्षाच्या नोकरीवरही मिळणार ग्रॅच्युइटी

Gratuity New Rules: देशातील कामगार सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच 4 नवीन कामगार संहिता लागू करणार आहे.
Indian Money
Indian MoneyDainik Gomantak
Published on
Updated on

Gratuity New Rules: कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील कामगार सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच 4 नवीन कामगार संहिता (New Labour Codes) करणार आहे. याबाबतची लेखी माहिती केंद्रीय कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली (Rameshwar Teli) यांनी लोकसभेत दिली आहे. अनेक राज्यांनी वेगवेगळ्या संहितांना संमती दिली आहे. त्यानंतर आता लवकरच केंद्र सरकार त्याची अंमलबजावणी करु शकते.

नव्या लेबर कोडमधील नियम बदलतील

नवीन कामगार संहिता (Labour Codes) लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार, रजा, भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीमध्ये बदल होतील. या अंतर्गत, कामाचे तास आणि आठवड्याचे नियम बदलणे देखील शक्य होणार आहे. त्यानंतर कर्मचार्‍यांना ग्रॅच्युइटीसाठी कोणत्याही संस्थेत 5 वर्षे काम करण्याची सक्ती राहणार नाही. सरकारने अद्याप त्याची घोषणा केलेली नाही, परंतु नवीन कामगार कायदा लागू होताच हा नियम लागू होईल.

Indian Money
Mahindra Thar प्रेमींसाठी आनंदाची बातमी, समोर आली 5-दरवाजाची थार; Video

किती ग्रॅच्युइटी मिळते माहीत आहे?

सध्या ग्रॅच्युइटीच्या नियमानुसार कोणत्याही संस्थेत 5 वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतरच ग्रॅच्युइटी दिली जाते. या अंतर्गत, ग्रॅच्युइटीची गणना त्या महिन्यातील कर्मचाऱ्याच्या पगाराच्या आधारावर केली जाते, ज्या दिवशी तुम्ही 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंपनी (Company) सोडता. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याने 10 वर्षे एखाद्या कंपनीत काम केले आणि शेवटच्या महिन्यात त्याच्या खात्यात 50 हजार रुपये आले. आता जर त्याचा मूळ पगार 20 हजार रुपये असेल. 6 हजार रुपये हा महागाई भत्ता आहे. त्यानंतर त्याची ग्रॅच्युइटी 26 हजार (Basic And Dearness Allowance) रुपयाच्या आधारे मोजली जाईल. ग्रॅच्युइटीमध्ये कामाचे दिवस 26 मानले जातात, त्यानुसार, गणना पाहूया..

26,000 / 26 म्हणजे एका दिवसासाठी 1000 रुपये

15X1,000 = 15000

आता जर कर्मचाऱ्याने 15 वर्षे काम केले असेल तर त्याला एकूण 15X15,000 = 75000 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल.

Indian Money
Thar च्या स्पर्धेत उतरणार 'मारुती सुझुकी Jimny', रस्त्यांवर धावणार 5-दारांचे मॉडेल

1 वर्षाच्या नोकरीवरही मिळणार ग्रॅच्युइटी?

लोकसभेत दाखल केलेल्या मसुद्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, जर कोणत्याही कर्मचाऱ्याने कोणत्याही ठिकाणी एक वर्ष काम केले असेल तर त्याला ग्रॅच्युइटी मिळेल. सरकारने (Government) ही व्यवस्था निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांसाठी (Employees) म्हणजेच कंत्राटावर काम करणाऱ्यांसाठी केली आहे. जर एखादी व्यक्ती एका कंपनीसोबत एका ठराविक कालावधीसाठी करारावर काम करत असेल, तर त्याला ग्रॅच्युइटी मिळेल. याशिवाय ग्रॅच्युइटी कायदा 2020 चा लाभ केवळ फिक्स टर्म कर्मचाऱ्यांना मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com