Indian Money Dainik Gomantak
अर्थविश्व

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत आली आनंदाची बातमी, पगारात होणार बंपर वाढ!

8th pay commission latest news: तुम्हीही आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे.

Manish Jadhav

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हीही पगारवाढीची वाट पाहत असाल तर लवकरच तुमच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. यासोबतच पेन्शनधारकांनाही मोठा लाभ मिळणार आहे.

8 व्या वेतन आयोगाबाबत सरकारकडून मोठी अपडेट जारी करण्यात आला आहे. तुम्हीही आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे.

आठवा वेतन आयोग स्थापन केला जाईल

सरकार लवकरच आठवा वेतन आयोग स्थापन करणार आहे. पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Employees) पगारात 44 टक्क्यांहून अधिक वाढ होऊ शकते, असे मानले जात आहे.

यासह फिटमेंट फॅक्टर व्यतिरिक्त इतर कोणत्याही सूत्रावर पगाराचे पुनरावलोकन केले पाहिजे. त्याचबरोबर, जुन्या आयोगाच्या तुलनेत या वेतन आयोगात बरेच बदल पाहायला मिळतील.

पगारात बंपर वाढ होणार आहे

सातव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 पट होता, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात 14.29 टक्क्यांनी वाढ झाली आणि या वाढीमुळे कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपये निश्चित करण्यात आले.

त्याचवेळी, आठव्या वेतन आयोगांतर्गत, असे मानले जाते की, यावेळी फिटमेंट फॅक्टर 3.68 पट असू शकतो, त्यानंतर कर्मचार्यांच्या पगारात 44.44 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

त्याचवेळी, कर्मचार्‍यांचा किमान पगार थेट 18,000 रुपयांवरुन 26,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो.

पगार 26,000 रुपयांनी वाढू शकतो

सरकारने (Government) आठव्या वेतन आयोगाची स्थापना जुन्या स्केलवर केल्यास फिटमेंट फॅक्टर त्याच्या आधारे ठेवला जाईल. या आधारावर कर्मचाऱ्यांचे 3.68 पट फिटमेंट करता येते.

या आधारावर कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात 44.44 टक्के वाढ होऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 26 हजार रुपये होऊ शकते.

सरकार 8 वा वेतन आयोग कधी लागू करु शकते?

सध्या आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकार 2024 मध्ये आठवा वेतन आयोग स्थापन करुन 2026 मध्ये लागू करु शकते.

त्याचबरोबर, देशात 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, त्यामुळे सरकार लवकरच कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT