Petrol and Diesel Dainik Gomantak
अर्थविश्व

केंद्रानंतर 'या' राज्यांनीही पेट्रोल आणि डिझेलचे दर केले कमी

गोवा सरकार (Goa Government) पेट्रोलवर (petrol)7 रुपये आणि डिझेलवर 7 रुपयांनी कपात करणार असून त्यामुळे डिझेल (Diesel) 17 रुपये आणि पेट्रोल 12 रुपयांनी कमी होणार

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी आणि डिझेल 10 रुपयांनी कमी केल्यानंतर आता अनेक राज्यांच्या सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली आहे.

वास्तविक, केंद्र सरकारच्या उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर आसाम, त्रिपुरा, गोवा, मणिपूर आणि कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट सात रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गुरुवारपासून या राज्यांमध्ये पेट्रोल 12 रुपयांनी आणि डिझेल 17 रुपयांनी स्वस्त होणार आहे. त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

AIMTC सातत्याने हा मुद्दा आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा वाहतूक क्षेत्रावर होणारा विपरीत परिणाम थेट सरकारकडे आणि विविध मंचांद्वारे मांडत आहे. मात्र, अनेक वर्षांपासूनच्या मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत. यावर सरकारने लवकरात लवकर विचार करावा, असे पुन्हा एकदा आवाहन आहे.

  • इंधनाच्या किमतींचे त्रैमासिक पुनरीक्षण

  • देशभरात एकसमान इंधन दर

  • पेट्रोलियम उत्पादने जीएसटी अंतर्गत आणली जातील

गोव्याचे मुख्यमंत्री (Goa CM) डॉ प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी ट्विट करत लिहिले की, पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा करून मोदी सरकारने तमाम भारतीयांना दिवाळी भेट दिली आहे. मी माननीय पंतप्रधानांचे आभार मानतो.

या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार असून महागाई (Inflation) नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे. यासोबतच गोवा सरकार पेट्रोलवर 7 रुपये आणि डिझेलवर 7 रुपयांनी कपात करणार असून त्यामुळे डिझेल 17 रुपये आणि पेट्रोल 12 रुपयांनी कमी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT