Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

PPF Scheme: पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यांसाठी मोदी सरकारने दिली आनंदाची बातमी, जून महिन्यात होणार 'हा' मोठा बदल!

PPF Scheme Interest Rate: केंद्र सरकारकडून अनेक सरकारी योजना राबवल्या जातात, ज्यामध्ये तुम्हाला भरघोस व्याजाचा लाभ मिळतो.

Manish Jadhav

PPF Scheme Interest Rate: केंद्र सरकारकडून अनेक सरकारी योजना राबवल्या जातात, ज्यामध्ये तुम्हाला भरघोस व्याजाचा लाभ मिळतो. जर तुम्ही सरकारी योजना PPF मध्ये तुमचे खाते (PPF Account) उघडले असेल, तर लवकरच तुम्हाला सरकारकडून मोठी बातमी मिळू शकते.

जून अखेरपर्यंत सरकार सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत मोठे बदल करु शकते. सरकार जून महिन्यात पीपीएफचे व्याजदर वाढवू शकते. अल्पबचत योजनेच्या व्याजदरांचे सरकार दर 3 महिन्यांनी पुनरावलोकन करते.

1 एप्रिल 2022 रोजी व्याजदर कमी करण्यात आले

सरकारने 2020 मध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत शेवटची वाढ केली. यानंतर 1 एप्रिल 2022 रोजी पीपीएफचे व्याजदर (Interest Rate) 7.9 टक्क्यांवरून 7.1 टक्के करण्यात आले. त्यानंतर या योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सरकार व्याजदर का वाढवत नाही?

तसेच, केंद्र सरकारने पीपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. यावेळी पीपीएफ खातेधारकांना आशा आहे की, जून 2023 च्या अखेरीस सरकार व्याजदर वाढवू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टॅक्स रिटर्ननंतर, या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर 10.32 टक्के व्याजाचा लाभ मिळतो. त्याचवेळी, इतर योजनांपेक्षा आधीच अधिक व्याज मिळत आहे.

मी कुठे खाते उघडू शकतो

तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीममध्ये किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करु शकता. तुम्ही ते तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून (Bank) कुठेही खाते उघडू शकता. 1 जानेवारी 2023 पासून, सरकार या योजनेत 7.1 टक्के दराने व्याजाचा लाभ देत आहे. तर PPF योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्ष आहे.

कर्जाचा लाभही घेता येईल

तुम्हाला पीपीएफ स्कीममध्ये कर सवलतीचा लाभही मिळतो. या योजनेत तुम्ही कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. या योजनेतील व्याजातून मिळणारी रक्कमही करमुक्त आहे. या योजनेत 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कर्जासाठी अर्जही करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK Live Updates T20 World Cup 2026: आधी फलंदाजी अन् आता गोलंदाजी; भारताच्या 'डबल अटॅक'ने पाकड्यांची 'दाणादाण'

IND vs PAK: 'भारत जादूटोणा करुन जिंकतो...', पाकिस्तानी क्रीडा विश्लेषकाचा अजब दावा; चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वर्ल्ड कपमध्येही तेच रडगाणं

IND vs PAK: युवराजचा रेकॉर्ड मोडला, कोहलीच्या क्लबमध्ये एन्ट्री! ईशान किशनचा पाकिस्तानविरुद्ध धमाका; बनला नवा 'सिक्सर किंग'

VIDEO: 10 चौकार 3 षटकार... खतरनाक ईशान किशन! पाकड्यांना धु धु धुतलं, तुफान फटकेबाजी व्हिडिओ पाहा

India vs Pakistan: सुरुवातच डगमगली! अभिषेक शर्मा पुन्हा शून्यावर बाद; सलमान अली आगाच्या गोलंदाजीवर फसला VIDEO

SCROLL FOR NEXT