PM Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

New Pension Rules: सरकारने घेतला मोठा निर्णय, आता पेन्शन आणि पगार वाढणार; कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी!

Pension and Salary Rules: तुम्हीही तुमची पेन्शन आणि पगार (Pension Hike) वाढवण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Manish Jadhav

New Pension and Salary Rules: तुम्हीही तुमची पेन्शन आणि पगार (Pension Hike) वाढवण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

केंद्र सरकार आता लाखो कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात वाढ करणार आहे. 2023 मध्ये कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये बंपर वाढ होणार आहे.

याबाबत शासनाकडून आदेश जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना यंदा मोठा पैसा मिळणार आहे. सध्या देशभरात जुन्या पेन्शनबाबत चर्चा, आंदोलने सुरु आहेत. दरम्यान, सरकार कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते.

जुनी पेन्शन पूर्ववत करण्याची मागणी सातत्याने होत आहे.

जुनी पेन्शन बहाल करण्याची मागणी यावेळी देशभरात जोरात सुरु आहे. या सर्व मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सरकार (Government) कर्मचाऱ्यांची किमान वेतन मर्यादा वाढवू शकते.

यावर्षी सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करु शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, किमान पगार 15,000 वरुन 21,000 पर्यंत वाढवला जाऊ शकतो.

भविष्य निर्वाह निधीचे योगदान वाढेल

कर्मचाऱ्यांची (Employees) किमान वेतन मर्यादा वाढवल्यानंतर पेन्शनमध्येही बंपर वाढ होणार आहे. यापूर्वी, 2014 मध्ये सरकारने ही मर्यादा वाढवली होती.

सध्या नवीन वर्षात पुन्हा एकदा पगारवाढ करण्याचा सरकारचा विचार आहे. पगार वाढल्याने पीएफमधील योगदानही वाढेल आणि त्याचवेळी पेन्शनमध्येही वाढ होईल.

पीएफचे योगदान किती वाढेल

भविष्य निर्वाह निधीच्या योगदानाबद्दल बोलायचे झाल्यास, किमान वेतन 15,000 रुपये मोजले जाते, ज्यामुळे EPS खात्यात जास्तीत जास्त 1250 रुपयेच योगदान दिले जाऊ शकते.

सरकारने पगार मर्यादा वाढवली तर योगदानही वाढेल. पगार वाढल्यानंतर, मासिक योगदान रुपये 1749 (21,000 रुपयांच्या 8.33%) असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT