PM Kisan Yojana Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: 14 कोटी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, 13 व्या हप्त्यापूर्वी सरकार देणार...!

PM Kisan Samman Nidhi 13th Installment: देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

PM Kisan Samman Nidhi 13th Installment: देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या देशाची निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांसाठी (पीएम किसान) 15 लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.

याबाबत माहिती देताना सरकारने म्हटले आहे की, देशभरातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पीएम किसान एफपीओ योजना असे या योजनेचे नाव आहे. यामध्ये तुम्हाला 15 लाख रुपयांची संपूर्ण आर्थिक मदत मिळत आहे.

आर्थिक मदत कोणाला मिळते?

माहिती देताना, सरकारने सांगितले की, या योजनेंतर्गत, ही आर्थिक मदत 11 शेतकरी गटांना म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटना (FPO/FPC) शेतीशी संबंधित सर्व व्यवसाय सेटअपसाठी दिली जाते. शेतकऱ्यांना (Farmer) आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

एखादी संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागेल

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एकत्र एक संस्था किंवा कंपनी (FPO) बनवावी लागेल, ज्यामध्ये किमान 11 शेतकरी असावेत.

अर्ज कसा करता येईल-

>> तुम्ही राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर (https://www.enam.gov.in/web/) जा.

>> येथे FPO च्या पर्यायावर क्लिक करा.

>> यानंतर 'Registration' या पर्यायावर जा.

>> आता नोंदणी फॉर्ममध्ये मागितलेली माहिती भरा.

>> आता पासबुक किंवा रद्द केलेला चेक आणि आयडी प्रूफ स्कॅन करा आणि अपलोड करा आणि सबमिट करा.

उत्पन्न दुप्पट होईल

या योजनेअंतर्गत सरकारला (Government) देशभरात सुमारे 10,000 एफपीओ तयार करायचे आहेत. यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्याही स्वावलंबी होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "मी भाजपमध्ये जाणार, ही केवळ वावडी", अफवा पसरवणाऱ्यांची तोंडं सरदेसाईंनी केली बंद VIDEO

खुशी मुखर्जीला 'सूर्या'शी पंगा घेणं पडलं महागात! 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल; आता म्हणते, "माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला"

Indian Racing Festival 2026: गोव्यात रंगणार 'इंडियन रेसिंग फेस्टिव्हल'चा थरार, CM प्रमोद सावंतांनी पोस्ट करत दिली माहिती

VIDEO: "म्हणून 50 हजार खर्चून गोव्याला जातो!" समुद्रात कचरा फेकणाऱ्या पर्यटकाचा व्हिडिओ पाहून नेटकर्‍यांचा पारा चढला

"एक आठवड्यात 10 कोटी दे नाहीतर तुला..." प्रसिध्द गायकाला 'लॉरेन्स बिश्नोई गँग'कडून धमकी, मनोरंजन विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT