PM Kisan Scheme: मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट! PM किसान योजनेत मिळणार 8 हजार रुपये

Budget 2023: केंद्र सरकार लवकरच सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात सरकारकडून अनेक घोषणा होण्याची शक्यता आहे.
Farmer
Farmer Dainik Gomantak
Published on
Updated on

Budget 2023: केंद्र सरकार लवकरच सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात सरकारकडून अनेक घोषणा होण्याची शक्यता आहे. यासोबतच पीएम किसान बाबतही काही घोषणा केल्या जातील अशी लोकांना आशा आहे. त्याचबरोबर आगामी अर्थसंकल्पात केंद्राकडून पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम वाढवण्याची अपेक्षा आहे.

पीएम किसान

पीएम किसान योजनेंतर्गत सध्या वार्षिक 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्याचवेळी, अशी चर्चा आहे की, पीएम किसान अंतर्गत मिळणारी रक्कम प्रति वर्ष 6,000 रुपयांवरुन 8,000 रुपये केले जाऊ शकते. सूत्रांचे म्हणणे आहे की, पीएम किसान रकमेत वाढ एका वर्षासाठी असू शकते आणि त्यानंतर त्याचा आढावा घेतला जाईल.

Farmer
PM Kisan Scheme: मोठी बातमी! कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी सरकारने जारी केला 'हा' आदेश

पीएम किसान योजना

"पीएम-किसान रकमेतील वाढ उपभोग आणि ग्रामीण मागणीला समर्थन देऊ शकते," असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, रक्कम दुप्पट करण्याच्या सूचना असल्या तरी, महसूल खर्च आणि महागाईचा दबाव रोखण्यावर सरकारने (Government) लक्ष केंद्रित केल्याने वाढ मर्यादित होऊ शकते. प्रति शेतकरी 2,000 रुपयांच्या वाढीमुळे सरकारला सुमारे 22,000 कोटी रुपयांचा वार्षिक अतिरिक्त खर्च करावा लागेल.

पंतप्रधान किसान सन्मान निधी

फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) अंतर्गत, प्रत्येक शेतकऱ्याच्या थेट लाभ हस्तांतरण (DBT) लिंक्ड बँक खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये 6000 वार्षिक हस्तांतरित केले जातात. योजनेच्या सुरुवातीला लाभार्थ्यांची संख्या 31 दशलक्ष होती, ती आता 110 दशलक्ष झाली आहे.

Farmer
आताच करा 'हे' काम अन्यथा PM Kisan Samman Nidhi चा 13वा हप्ता खात्यात जमा होणार नाही

पीएम किसान योजना

2020 मध्ये कोविड महामारीमुळे लॉकडाऊन दरम्यान शेतकऱ्यांसमोर (Farmer) आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी PM-KISAN योजनेंतर्गत गरजू शेतकऱ्यांना 2 ट्रिलियन रुपयांहून अधिक रुपयांची आर्थिक मदत तीन वर्षांत देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com