Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

Senior Citizen Scheme: ज्येष्ठ नागरिकांना मोदी सरकारकडून आनंदाची बातमी, मिळणार मोठा फायदा!

Manish Jadhav

Senior Citizen Scheme Latest News: केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला डबल फायदा मिळेल.

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला सरकारच्या (Government) अशा दोन खास योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना अनेक विशेष फायदे मिळतील.

दरम्यान, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY) अशी या योजनांची नावे आहेत. या दोन्ही योजना वृद्धांमध्ये लोकप्रिय आहेत.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

सेवानिवृत्तीसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना हा उत्तम पर्याय मानला जातो. यामध्ये गुंतवणूक केल्यावर करमाफीपासून व्याजापर्यंतचे फायदे दिले जातात. तुम्ही संयुक्त खात्यात 60 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकता. 60 वर्षांचा कोणताही नागरिक SCSS मध्ये गुंतवणूक (Investment) करु शकतो आणि यामध्ये तुम्हाला 8% व्याज दिले जाते. यामध्ये, निवृत्तीच्या एका महिन्याच्या आत, तुम्ही वयाच्या 55 ​​ते 60 वर्षापर्यंत एससीएसएसमध्ये पैसे जमा करु शकता.

प्रधानमंत्री वय वंदना योजना

पीएम वय वंदना योजना ही एक प्रकारची पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला मासिक पैसे मिळतात. यामध्ये पती-पत्नीला महिन्याला 18500 रुपये मिळतात. विशेष म्हणजे, यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि 10 वर्षानंतर तुम्हाला संपूर्ण पैसे व्याजासह परत मिळतात.

कोण लाभ घेऊ शकेल?

या योजनेत 60 वर्षे वयाचा कोणताही नागरिक याचा लाभ घेऊ शकतो. या योजनेत 7.40 टक्के व्याज दिले जाते. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त 15 लाखांपर्यंत गुंतवणूक करता. तसेच, संयुक्त खात्यात 30 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते.

तुम्हाला कोणत्या मध्ये जास्त फायदा मिळेल?

जर तुम्हाला ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळेल. त्याचवेळी, प्रधानमंत्री वय वंदना योजनेत असे होत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT