car buyer guide new car buying tips things to keep in mind before buying car Danik Gomantak
अर्थविश्व

नवी कार घेतानाही होऊ शकते चूक, व्यवहार करताना जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

नवी कारचा व्यवहार करताना जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

दैनिक गोमन्तक

आपली आवडती कार खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते, परंतु असे करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते कारण कार हे एक महाग उत्पादन आहे. अगदी स्वस्तातली कार घेण्यासाठीही एका व्यक्तीला किमान 3 ते 4 लाख रुपये खर्च करावे लागतात. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही कार खरेदी करता तेव्हा एक छोटीशी चूकही महागात पडू शकते, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्याची तुम्ही कार खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे. (car buyer guide new car buying tips things to keep in mind before buying car)

कोणती कार

तुम्हाला कोणती कार आवडते ते ठरवा, जर तुम्हाला हॅचबॅक कार आवडत असतील तर हॅचबॅक कारचे पर्याय शोधा, जर तुम्हाला सेडान कार आवडत असेल तर सेडान कार आणि तुम्हाला एसयूव्ही कार आवडत असतील तर ते ठरवा.

उद्देश

तुम्हाला कोणत्या उद्देशाने कार घ्यायची आहे याचा आधी विचार करा. समजा, जर तुम्ही शहरात गाडी चालवायला गाडी घेतली असेल, तर तुम्ही सिटी ड्राईव्हसाठी ओळखली जाणाऱी कार घ्यावी. दुसरीकडे, जर तुम्हाला लाँग ड्राईव्हसाठी किंवा पर्वतांमध्ये फिरण्यासाठी कार घ्यायची असेल, तर तुम्ही मोठी इंजिन असलेली आणि लाँग ड्राईव्हसाठी चांगला अनुभव देणारी कार खरेदी करावी.

आसन क्षमता

जर तुम्ही कौटुंबिक कारणासाठी कार खरेदी करत असाल आणि तुमचे कुटुंब मोठे असेल तर तुम्ही सात सीटर कार खरेदी करू शकता. तुमच्या कुटुंबात कमी लोक असतील तर तुम्ही 5 सीटर कार खरेदी करू शकता. तसेच, जर तुम्हाला एकट्याने गाडी चालवायची असेल, तर तुम्ही कोणत्याही आसन क्षमतेची कार खरेदी करू शकता परंतु ते करताना तुम्ही दीर्घकालीन वापर लक्षात ठेवावा.

मायलेज

कार खरेदी करताना, प्रति लिटर इंधनात ती किती किलोमीटर प्रवास करते हे पाहण्यासाठी तिचे मायलेज तपासण्याची खात्री करा. कारण, कार खरेदी केल्यानंतर त्याच्या वापराची किंमत मायलेजवरूनच ठरवली जाते. जर तुम्ही अशी कार घेतली असेल, ज्यामुळे प्रवासाचा खर्च कमी होईल, तर या गोष्टीवर संशोधन करून जाणून घ्या की बाजारात कोणत्या गाड्या आहेत, ज्यांचे मायलेज जास्त आहे.

कार ही एक महागडी डील आहे आणि ती घेण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. अशा परिस्थितीत आधी तुमचे बजेट ठरवा की कार घेण्यासाठी तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील, त्यानुसार कार खरेदी करा. जर तुम्ही तुमच्या बजेटच्या बाहेर कार खरेदी केली तर ती तुमच्यासाठी अडचणीची ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT