UPI Payment Dainik Gomantak
अर्थविश्व

Credit Card: 'या' बॅकेच्या ग्राहकांचे बल्ले-बल्ले, आता क्रेडिट कार्डद्वारे करु शकणार हे काम

Manish Jadhav

Canara Bank: बँका वेळोवेळी त्यांच्या ग्राहकांना विविध सुविधा देत असतात. या सुविधांद्वारे ग्राहकांना वेगवेगळे फायदे मिळत राहतात. आता एका बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरु केली आहे. यातून ग्राहकांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

वास्तविक, या बँकेने रुपे क्रेडिट कार्डवर UPI पेमेंट करण्याची सुविधा दिली आहे. UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) व्यापाऱ्यांसाठी आपल्या RuPay क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट सेवा सुरु करणारी कॅनरा बँक ही भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनली आहे. ही सुविधा आता बँकेच्या 'कॅनरा AI1' बँकिंग सुपर अॅपमध्ये उपलब्ध आहे.

क्रेडीट कार्ड

याचा अर्थ कॅनरा बँकेचे (Canara Bank) ग्राहक आता थेट त्यांच्या RuPay क्रेडिट कार्डवरुन व्यापाऱ्यांना UPI पेमेंट करु शकतात. या सुरक्षित डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करुन व्यवहार करण्यासाठी ग्राहकांनी त्यांचे कॅनरा बँक रुपे क्रेडिट कार्ड त्यांच्या UPI आयडीशी लिंक करणे आवश्यक आहे. तर क्रेडिट कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया सध्याच्या अकाऊंट लिंकिंग प्रक्रियेसारखीच आहे.

UPI व्यवहार

दुसरीकडे, लिंकिंगसाठी अकाऊंट लिस्टिंग दरम्यान ग्राहक (Customer) सहजपणे त्यांचे कॅनरा क्रेडिट कार्ड निवडू शकतात. याव्यतिरिक्त, UPI व्यवहारांसाठी लागू असलेली व्यवहार मर्यादा RuPay क्रेडिट कार्ड वापरुन केलेल्या UPI पेमेंटसाठी देखील लागू होईल.

कॅनरा बँकेने यावर भर दिला की, या नवीन सुविधेमुळे डिजिटल पेमेंटमध्ये लक्षणीय वाढ होईल आणि UPI इकोसिस्टमचा विस्तार होईल.

रुपे क्रेडिट कार्ड

कॅनरा बँकेचे रुपे क्रेडिट कार्ड UPI वर लाइव्ह होणार असल्याने, ग्राहकांना त्यांचे कार्ड बाळगण्याची गरज न पडता मर्चेंट आउटलेटवर पेमेंट करताना अधिक आनंद मिळेल.

UPI सह RuPay क्रेडिट कार्डचे एकत्रीकरण वापरकर्त्यांच्या क्रेडिट वापराच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणत आहे. त्याचबरोबर, निःसंशयपणे देशभरात डिजिटल पेमेंटचा अधिकाधिक अवलंब करण्यात मदत करेल.

हे लक्षात ठेवा

सध्या ही सुविधा व्यापारी पेमेंटला अनुमती देते. कॅनरा बँकेच्या म्हणण्यानुसार, RuPay क्रेडिट कार्डमधून UPI ​​पेमेंट व्यक्ती-टू-व्यक्ती व्यवहार, कार्ड-टू-कार्ड ट्रान्सफर किंवा कॅश-आउट व्यवहारांसाठी वापरली जाऊ शकत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT