PM Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

LPG Cylinder: मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, गॅस सिलिंडर 200 रुपयांनी झाला स्वस्त!

LPG Gas Cylinder Price: महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांसाठी खूशखबर आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत गॅस सिलिंडरच्या दराबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

Manish Jadhav

LPG Gas Cylinder Price: महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांसाठी खूशखबर आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत गॅस सिलिंडरच्या दराबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने गॅस सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी मंजूर केली आहे, म्हणजेच आतापासून तुम्हाला गॅस सिलिंडर स्वस्तात मिळणार आहे.

उज्ज्वला योजनेंतर्गत किमती कमी होतील

सरकारकडून (Government) मिळालेल्या माहितीनुसार, उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

7500 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार

उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति सिलिंडर ₹ 200 अतिरिक्त अनुदान मंजूर करण्यात आले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारवर सुमारे 7500 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

मार्चपासून दर बदललेले नाहीत

गॅस सिलिंडरच्या किमतींबद्दल बोलायचे झाल्यास, ऑगस्टच्या पहिल्या तारखेला दिल्लीत घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमत 1103 रुपये होती. त्याचवेळी, मुंबईत (Mumbai) गॅस सिलेंडरची किंमत 1102.50 रुपये, कोलकातामध्ये 1129 रुपये आणि चेन्नईमध्ये 1118.50 रुपये आहे.

मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्याचबरोबर, कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत अनेक वेळा चढ-उतार झाले आहेत.

वर्षभरात 12 सिलिंडर मिळतात

केंद्र सरकारने 2016 मध्ये देशभर उज्ज्वला योजना सुरु केली होती. या योजनेंतर्गत, लाभार्थी एका वर्षात एकूण 12 सिलिंडरवर अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. शासकीय योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शनची सुविधा मोफत मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT