Income Tax  Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax: 'या' लोकांना भरावा लागणार नाही कर, अर्थसंकल्पापूर्वी सरकारने ट्वीट करुन...!

Income Tax Slab: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारामन नोकरदारांना करात सवलत देणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमन्तक

Income Tax Slab: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारामन नोकरदारांना करात सवलत देणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्र्यांनी ज्येष्ठांना मोठी भेट दिली आहे. त्यासाठी नियमात सुधारणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना दिलेले वचन पूर्ण करत अर्थ मंत्रालयाने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.

ट्विटमध्ये काय म्हटले आहे

ट्विटनुसार, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, ज्यांच्या उत्पन्नाचा स्रोत म्हणून केवळ पेन्शन आणि बँक व्याज आहे, त्यांना दिलासा मिळेल. याशिवाय त्यांना आयकर भरण्याची गरज भासणार नाही. 2022 च्या अर्थसंकल्पापूर्वी प्राप्तिकरातील सवलतीबाबत चर्चेची फेरी सुरु आहे. नोकरदार लोक आयकर (Income Tax) स्लॅबमध्ये सवलतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र त्याआधीच वृद्धांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

करात सूट मिळेल

ट्विटमध्ये अर्थ मंत्रालयाने म्हटले की, 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना करात सूट देण्यात आली आहे. ज्यांचे उत्पन्न पेन्शन (Pension) किंवा बँकांचे व्याज आहे, अशा लोकांना दिलासा दिला जाईल. यासाठी सरकारने आयकर कायद्यात नवीन कलम समाविष्ट केले आहे. 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना लाभ मिळावा यासाठी आयकर कायदा, 1961 च्या नियमांमध्ये सुधारणा करुन नवीन कलम कलम 194-P जोडण्यात आले आहे. या दुरुस्तीबाबत बँकांनाही कळवण्यात आले आहे.

तसेच, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने म्हटले की, त्याच्याशी संबंधित फॉर्म आणि शर्तींसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासोबतच कराच्या नियम 31, नियम 31A, फॉर्म 16 आणि 24Q मध्येही आवश्यक बदल करण्यात आले आहेत. अर्थमंत्र्यांनी 2022 च्या अर्थसंकल्पातही याबाबत घोषणा केली होती. आता ज्या बँकेत वृद्धांचे खाते असेल, तीच बँक त्यांच्या उत्पन्नावर जो काही कर असेल तो कापून घेईल. टॅक्स रिटर्नमध्ये सूट मिळण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना फॉर्म 12BBA भरुन बँकेत जमा करावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

Adam Zampa Record: कांगारुचा नवा 'किंग ऑफ स्पिन'! ॲडम झाम्पा ठरला ऑस्ट्रेलियाचा नंबर 1 स्पिनर; शेन वॉर्नचा मोडला मोठा रेकॉर्ड

Iron Ore Mining Goa: कोडली खाणीला पर्यावरणीय मंजुरीपूर्वी मोठी सुनावणी; 377 हेक्टर क्षेत्रात 35 लाख टन लोहखनिज उत्खननाचा प्रस्ताव

Goa Politics: निंबाळकरांची 'ती' पोस्ट काही तासांत डिलीट; सरदेसाईंवरील टीकेनंतर राजकीय चर्चेला उधाण, 'गोवा फर्स्ट'वर निशाणा

खरी कुजबुज: स्वच्छतेत 'अर्थ' नाही!

SCROLL FOR NEXT