Union Budget 2023 Dainik Gomantak
अर्थविश्व

Union Budget 2023: काही तासातच अर्थसंकल्प सादर होणार; वाचा एका क्लिकवर संपूर्ण वेळापत्रक

आज अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करणार असून सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.

दैनिक गोमन्तक

Union Budget 2023: आज मोदी सरकारचा निवडणूकपूर्व शेवटचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.  पुढच्या वर्षी निवडणुका असल्याने आजच्या अर्थसंकल्पात काय मिळणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

करदाते, गुंतवणूकदार, शेतकरी यांच्या या अर्थसंकल्पाकडून  मोठ्या अपेक्षा आहेत शिवाय पर्यावरणपूरक योजना घोषित होण्याचीही शक्यता आहे.

गृहिणींना आणि नोकरदार महिला वर्गाला मोदी सरकारच्या पेटाऱ्यातून काय मिळणार हे ही पाहावं लागेल.  जाणून घेऊयात आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पाची सर्व माहिती केवळ एका क्लिक वर. 

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आणि नंतर अनेक औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात. या सर्व गोष्टी ठराविक वेळेत केल्या जातात. अर्थ मंत्रालयाने अर्थसंकल्पाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. 

  • अर्थसंकल्पाचे संपूर्ण वेळापत्रक असे असेल

8:40 वाजता- अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून बाहेर पडतील आणि नॉर्थ ब्लॉकमधील अर्थ मंत्रालयाच्या कार्यालयात जातील. अर्थ मंत्रालयाच्या कार्यालयातून त्या बजेटची प्रत घेऊन संसदेला रवाना होतील.

सकाळी 9 वाजता - अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 9 वाजता अर्थ मंत्रालयाच्या गेट क्रमांक 2 मधून बाहेर पडतील. यानंतर अर्थ मंत्रालयाचे अधिकारी आणि अर्थमंत्र्यांचे बजेटसोबत फोटो सेशन होणार आहे.

9:25 वाजता - अर्थमंत्रालयातून बाहेर पडल्यानंतर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पावर राष्ट्रपतींची मंजुरी घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात जातील. तेथे ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. यादरम्यान राष्ट्रपती मुर्मू अर्थसंकल्पाला औपचारिक मंजुरी देतील.

10 वाजता - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मंजुरी घेतल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट घेऊन संसदेत पोहोचतील.

10:10 वाजता - संसदेत पोहोचल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत अर्थसंकल्पाला मंत्रिमंडळाकडून अधिकृत मंजुरी घेण्यात येणार आहे. 

11 वाजता - अर्थमंत्री सकाळी 11 वाजता संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील आणि त्यावर बोलण्यास सुरुवात करतील.

दुपारी ३ वाजता - संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये आधी ती अर्थसंकल्पातील घोषणांवरील मुख्य मुद्दे सांगणार आहे. यानंतर ती पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT