Ramdev Baba  Dainik Gomantak
अर्थविश्व

Patanjali Foods: पतंजली फूड्सला मोठा झटका, NSE अन् BSE ने उचलले 'हे' पाऊल

Share Market: बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली समूहाची कंपनी पतंजली फूड्स लिमिटेड (पीएफएल) ला मोठा झटका बसला आहे.

Manish Jadhav

Share Market: बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली समूहाची कंपनी पतंजली फूड्स लिमिटेड (पीएफएल) ला मोठा झटका बसला आहे.

वास्तविक, शेअर बाजारात NSE आणि BSE ने पतंजली फूड्स लिमिटेड (PFL) च्या प्रवर्तकांच्या शेअर्सवर बंदी घातली आहे. मात्र, या निर्णयामुळे कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

पतंजली फूड्स लिमिटेड म्हटले की, 'कंपनीतील प्रवर्तकांच्या शेअरहोल्डिंगवर रोख लावला तरी आमच्या आर्थिक स्थिती आणि कामकाजावर परिणाम होणार नाही.'

पतंजली फूड्स

पतंजली फूड्स लिमिटेडने माहिती दिली की, बीएसई आणि एनएसईने पतंजली आयुर्वेद लिमिटेड, आचार्य बालकृष्ण, पतंजली ट्रान्सपोर्ट आणि पतंजली ग्रामोद्योग न्यास यांच्यासह त्यांच्या 21 प्रवर्तक संस्थांच्या शेअर्समध्ये (Shares) किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग नियमांचे पालन न केल्याबद्दल बंदी घातली आहे.

सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) नियम, 1957 चा नियम 19A(5) सूचीबद्ध घटकासाठी किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग (MPS) 25 टक्के असणे अनिवार्य करते.

पतंजली फूड्स शेअर

पतंजली फूड्सने माहिती दिली की, त्यांचे प्रवर्तक किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग साध्य करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत आणि या संदर्भात चर्चा सुरु आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की, ते यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. कंपनीच्या प्रवर्तकांना खात्री आहे की, त्यांना पुढील काही महिन्यांत अनिवार्य एमपीएस मिळेल.

पतंजली

सध्या, कंपनीचे 19.18 टक्के शेअर्स सार्वजनिक भागधारकांकडे आहेत आणि MPA साध्य करण्यासाठी सार्वजनिक शेअरहोल्डिंग 5.82 टक्क्यांनी वाढवावे लागेल.

शेअर्सवरील बंदीच्या या आदेशामुळे एकूण 29,25,76,299 इक्विटी शेअर्स प्रभावित होतील. NSE वर पतंजली (Patanjali) फूड्सच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्च किंमत 1495 रुपये आहे आणि 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 865.85 रुपये आहे.

16 मार्च 2023 रोजी कंपनीचा शेअर दुपारी 2.30 पर्यंत घसरणीसह 944 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

SCROLL FOR NEXT