2024 Hyundai Creta Facelift Dainik Gotakman
अर्थविश्व

अवघ्या 25 हजारांत बुक करा Hyundai Creta Facelift, जाणून घ्या खास फिचर्स

ही नवीन Hyundai Creta Facelift किआ सेल्टोस फेसलिफ्ट, मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणि आगामी टाटा कर्वशी स्पर्धा करेल.

Ashutosh Masgaunde

Book 2024 Hyundai Creta Facelift in just 25 thousand, know special features:

Hyundai Motor India ने नुकतेच 2024 Hyundai Creta facelift ची बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली. त्यामुळे आता तुम्ही ही कार अवघ्या 25,000 रुपयांच्या टोकन रकमेसह बुक करू शकता.

या मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटची अद्ययावत आवृत्ती 16 जानेवारी 2024 रोजी लॉन्च केली जाईल.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण सारख्या चित्रपट कलाकारांनी या नवीन Hyundai Creta च्या बाह्य आणि आतील भागाचा फर्स्ट लुक सादर केला आहे. ही कार Hyundai च्या ग्लोबल डिझाईन लँग्वेज सेन्सियस स्पोर्टिनेस आणि प्रिमियम इंटीरियरसह प्रशस्त केबिन आणि सर्व अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.

या नवीन Hyundai Creta चे बुकिंग 2 जानेवारीपासून सुरु झाले आहे. 25 हजार रुपयांच्या बुकिंग रकमेसह तुम्ही ही कार बुक करू शकता.

तुम्ही ही कार ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने बुक करू शकता. ही नवीन Hyundai Creta प्रगत आणि निष्क्रिय सुरक्षा वैशिष्ट्ये, 360 डिग्री कॅमेरा, स्पोर्टी आणि पॉवरपॅक नवीन 1.5 लिटर टर्बो GDI पेट्रोल इंजिनसह सादर करण्यात आली आहे.

फिचर्स

Hyundai Motor India ची ही नवीन कार चार ट्रान्समिशनसह आणली जात आहे. या कारमध्ये E, EX, S, S (ऑप्शनल), SX, SX Tech, SX (ऑप्शनल) असे प्रकार असतील.

ही नवीन SUV 6 सिंगल कलर आणि एक ड्युअल कलर ऑप्शनसह येत आहे. ही कार नवीन हॉरिझन एलईडी पोझिशनिंग लॅम्प आणि डीआरएल, क्वाड बीम एलईडी हेडलॅम्प्स, फ्युचरिस्टिक कॉकपिट डिझाइनसह प्रीमियम इंटीरियर, इन्फोटेनमेंट आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी ड्युअल स्क्रीनसह अनेक छान वैशिष्ट्यांसह येत आहे.

किंमत

ही नवीन Hyundai Creta फेसलिफ्ट किआ सेल्टोस फेसलिफ्ट, मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणि आगामी टाटा कर्वशी स्पर्धा करेल.

इंडिया टुडेच्या अहवालानुसार, 2024 Hyundai Creta फेसलिफ्टची किंमत 11 लाख ते 20 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Today's Live Updates Goa: अखेर त्या महिलेचा मृतदेह सापडला!

IFFI 2024: घरबसल्या बघा 'इफ्फी'चा सोहळा! Live Streaming साठी प्रसारभारतीने दिली 'ही' खास सुविधा..

Bhandari Community In Goa: भंडारी समाजाच्या नव्या समितीला ‘कारणे दाखवा’ नोटीस; वाद महिनाभर राहणार प्रलंबित

C K Nayudu Trophy: गोव्याच्या सलामीवीरांची झुंझार फलंदाजी! अझानचे शानदार शतक; सामना अनिर्णित राखण्यात यश

Morjim: मोरजीत 'कॅसिनो'ला थारा नाही! आमदार आरोलकरांचा स्थानिकांना पाठिंबा; परवाने मागे घ्‍यायची मागणी

SCROLL FOR NEXT