Mukesh Ambani & Gautam Adani Dainik Gomantak
अर्थविश्व

World's Top Billionaires: मुकेश अंबानींनी पुन्हा झुकेरबर्गला टाकले मागे, गौतम अदानींच्या संपत्तीत मोठी घसरण!

World's Top Billionaires: जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळाला आहे. या यादीत मुकेश अंबानींचे स्थान पुन्हा एकदा वाढले आहे.

Manish Jadhav

World's Top Billionaires: जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळाला आहे. या यादीत मुकेश अंबानींचे स्थान पुन्हा एकदा वाढले आहे.

अंबानी यांनी पुन्हा मार्क झुकरबर्गला मागे टाकले. या यादीत अंबानी आता 12 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे, अदानीबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या संपत्तीत मोठी घसरण पाहायला मिळाली.

मुकेश अंबानी यांची संपत्ती 85.8 अब्ज डॉलर झाली आहे

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या संपत्तीत गेल्या 24 तासांत 1.4 अब्ज डॉलर्स किंवा 11,488 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर अंबानींची एकूण संपत्ती $85.8 बिलियन झाली आहे. श्रीमंतांच्या यादीत अंबानी आता 12 व्या स्थानावर पोहोचले आहेत.

अदानी 23 व्या स्थानावर आहे

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना अंबानींनी पुन्हा मागे सोडले. तर श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी (Gautam Adani) 23 व्या स्थानावर घसरले आहेत.

अदानींच्या संपत्तीत मोठी घसरण

अदानींच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे मालमत्तेत मोठी घसरण झाली आहे. यासोबतच हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.

यामुळे त्यांची संपत्ती या वर्षात आतापर्यंत 63.5 अब्ज डॉलरने कमी झाली. सोमवारी अदानींच्या एकूण संपत्तीत $4.78 अब्जची घट झाली.

टॉप-5 यादीत कोणाचा समावेश आहे

या यादीत बर्नार्ड अर्नॉल्ट पहिल्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 208 अब्ज डॉलर्स आहे. यानंतर इलॉन मस्क दुसऱ्या क्रमांकावर आहे.

त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस, चौथ्या क्रमांकावर बिल गेट्स आणि पाचव्या क्रमांकावर वॉरेन बफे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pitbull Dog Attack: चिंबल येथे पिटबूल कुत्र्याचा हल्ला; 10 वर्षांची लहानगी गंभीर जखमी

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT